भारतीय संघाेचा फिरकीपटू अष्टपैलू रविंद्र जडेजा नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा हिरो ठरला. ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात स्वस्तात गुंडाळण्यासाठी जडेजाची भूमिका सर्वात महत्वाची राहिली. जडेजाने पहिल्या डावात गोलंदाजाच्या रूपात पाच विकेट्स घेतल्य. तसेच शुक्रवारी (10 फेब्रुवारी) दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी स्वतःचे अर्धशतक देखील पूर्ण केले. या कामगिरीनंतर जडेजाने एका खास यादीत सर्वोच्च स्थान पटकावले.
भारतीय संघाने या सामन्या नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात अवघ्या 177 धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाला स्वस्तात बाद करण्यासाटी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची भूमिका सर्वात महत्वाची राहिली. जडेजाने पहिल्या डावात 22 षटके गोलंदाजी केली आणि यात 47 धावा खर्च करून सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाने आतापर्यंत तब्बल सात वेळा पाच विकेट्सचा हॉल आणि अर्धशतक केले. जडेजा सात कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा भारतीय संघाचा दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी रविचंद्रन अश्विनने अशी कामगिरी केली होती. तसेच भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी चार वेळा पाच विकेट्स आणि अर्धशतक केले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स हॉल आणि अर्धशतक करणारे खेळाडू
7 – रविंद्र जडेजा
7 – रविचंद्रन अश्विन
4 – कपिल देव
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या एखाही फलंदाजाला अर्धशतक करू दिले नाही. मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 49 धावा केल्या, तर स्टीव स्मिथ 37 धावा करून बाद झाला. भारतासाठी जडेजापाठोपाठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल दिसत असली, तरी भारतीय संघासाठी पहिल्या दोन विकेट्स मात्र मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांनीच घेतल्या. कसोटी सामन्याच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये खेळपट्टीवर फिरकीची जादू दिसणार यात मात्र शंका नाही. (Ravindra Jadeja became the second player to take five wickets and a half-century for India seven times in Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉप होऊनही राहुलला फलंदाजी प्रशिक्षकाचा भक्कम पाठिंबा का? म्हणाले, ‘केएलसाठी प्रामाणिकपणे सांगतो…’
मोठी बातमी! तब्बल 40 दिवसांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला पंत, फोटोसोबत लिहिले मन जिंकणारे कॅप्शन