भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसर्या वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने दमदार अर्धशतकी खेळी केली. ५० चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या जडेजाच्या फलंदाजीचे सर्वच स्तरातून कौतुक होत होते. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना जडेजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३०३ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मात्र, रवींद्र जडेजाने त्याच्या १० षटकांत ६२ धावा दिल्या. यासह वनडे सामन्यांत सर्वाधिक वेळा किमान ६० धावा देणार्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जडेजा दुसर्या स्थानी पोहोचला.
२४ वेळा दिल्या किमान ६० धावा
डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा मर्यादित षटकांच्या सामन्यांत किफायतशीर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, वनडे सामन्यांतील त्याचे आकडे या दाव्याला खोटं ठरवतात. जडेजाने आजवर खेळलेल्या वनडे सामन्यांमधे तब्बल २५ वेळा ६० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. हा नकोसा विक्रम नावावर असणार्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जडेजा आता दुसर्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर आणि झहीर खान संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे.
भारतीय गोलंदाजांनी जिंकवला सामना
जडेजाच्या नावावर आजच्या सामन्यात या नकोश्या कामगिरीची नोंद झाली असली, तरी इतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे भारतीय संघाने तिसरा वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ३०३ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांपैकी शार्दुल ठाकूर ३ बळी पटकावत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, तर बुमराह आणि पदार्पणवीर नटराजनने प्रत्येकी २ बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. मात्र, पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळविल्याने ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली.
वनडे सामन्यांत सर्वाधिक वेळा ६० किंवा त्याहून अधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज
२५ वेळा- अजित आगरकर आणि झहीर खान
२४ वेळा- रवींद्र जडेजा
२३ वेळा- आशिष नेहरा
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्या-जडेजा जोडीची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दीडशतकी भागीदारी करत मोडला १० वर्षापूर्वीचा रेकॉर्ड
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई