---Advertisement---

‘जडेजाला ११ वर्षांनंतरही तितका सन्मान मिळत नाही’, माजी भारतीय खेळाडूने व्यक्त केली खंत

On: रविवार, डिसेंबर 6, 2020 12:05 AM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेत २-१ ने पराभव पत्करल्यानंतर, भारतीय संघाने पहिला टी२० सामना जिंकत, मालिकेत आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यावेळी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावलेला रवींद्र जडेजा हॅमस्ट्रिंग व कन्कशनचा त्रास झाल्याने उर्वरित दोन सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याचवेळी, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने म्हटले आहे की, गेली ११ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असूनही रवींद्र जडेजाला योग्य तो मान दिला जात नाही.

कैफने केली जडेजाची स्तुती

भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या मोहम्मद कैफने भारताच्या सलग दोन विजयात महत्वाचे योगदान देणाऱ्या रवींद्र जडेजाचे कौतुक करताना ट्वीट केले. या ट्विटमध्ये कैफने म्हटले, ‘जडेजाने सलग दोन सामन्यात धडाकेबाज कामगिरी करून दाखवून दिले आहे की, तो भारतीय संघासाठी किती मौल्यवान आहे. तो संघाला संतुलन प्राप्त करून देतो. अकरा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळूनही त्याला तितका मान दिला जात नाही, जो त्याला मिळायला हवा. येणाऱ्या सामन्यांत भारतीय संघाला त्याची कमतरता जाणवेल.’

सलग दोन सामन्यात जडेजाने केली दिमाखदार कामगिरी

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत मिळवलेल्या दोन्ही विजयात जडेजाने सिंहाचा वाटा उचलला आहे. वनडे मालिकेत भारतीय संघ २-० ने पिछाडीवर पडल्यानंतर अखेरच्या सामन्यात जडेजाने ६६ धावांची वेगवान खेळी करत, भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली होती. भारताने तो सामना जिंकून आपली प्रतिष्ठा राखलेली.

टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ संघर्ष करत असताना, जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २३ चेंडूत ४४ धावांची आतिशी खेळी केली होती. त्यानंतर, त्याला कन्कशनचा त्रास झाल्याने तो गोलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नव्हता. तो टी२० मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही, याची माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली होती. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता

“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”

‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी

ट्रेंडिंग लेख-

‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?

पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---