नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (नाडा) च्या आकड्यांनुसार रविंद्र जडेजा सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक वेळा ही चाचणी देणारा खेळाडू ठरला आहे. जडेजाने यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत तीन वेळा डोपिंग चाचणी दिली आहे. नाडाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पहिल्या पाच महिन्यात एकून 55 क्रिकेटपटूंनी डिपिंग चाचणी दिली आहे.
या आकडेवारून समजते की, यावर्षी सुरुवातच्या पाच महिन्यात झालेल्या डिपिंग चाचण्यांची संख्या मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे. 2021 मध्ये 54, तर 2022 मध्ये 60 नमुने चाचणीसाठी घेतले गेले होते. यापूर्वी 2021 आणि 2022 मध्ये रोहित शर्मा याने सर्वाधिक वेला डोपिंग चाचणी दिली होती. नाडाने या दोन्ही वर्षात रोहितची तीन-तीन वेळा चाचणी घेतली होती.
चालू वर्षात जानेवारी महिन्यापासून रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सर्वाधिक तीन वेळा या चाचणीला समोरे गेला आहे. पण त्याचसोबत भारतीय क्रिकेट संघातील सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, मयंक अगरवाल, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, रिद्धिमान साहा, दिनेस खार्दिक, यशस्वी जयसवाल, अंबाती रायुडू, पियुष चावला आणि मनीश पांडे यांचे नावे आहेत.
दरम्यानच्या काळात नाडाकडून काही विदेश क्रिकेटपटूंच्या देखील डिपिंग चाचण्या घेतल्या गेल्या. यामध्ये डेविड वीज, डेविड मिलर, कॅमरून ग्रीन, सुनील नारेन, आंद्रे रसेल, डेविड वॉर्नर, राशिद खान, डेविड विली, ट्रेंट बोल्ट, मार्कस स्टॉयनिस, मार्क वुड, एडम जम्पा, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंच्या चाचण्या एप्रिल महिन्यात झाल्या. जेव्हा इंडियन प्रीमियर लीगसाठी सर्वजण भारतात आले होते.
क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमधील मोठ्या नावांनाही डोपिंग चाचणीला सामोरे जावे लागले. यात ऑलिम्पिक पदक विजेती मिराबाई चानू, बॉक्सर लवलीना बोरगोहेन, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट, हॉकी खेळाडू हरनप्रीत सिंग, पीआर श्रीजेश आणि सविता पुनिया यांचीही नावे आहेत. (Ravindra Jadeja gave doping test thrice this year)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची संपत्ती फक्त ‘एवढीच’, आकडा विराटच्या निम्म्या संपत्तीपेक्षाही कमी
इंग्लंडच्या भूमीत तळपली पृथ्वी शॉची बॅट! वादळी द्विशतक ठोकत उद्ध्वस्त केले मोठे रेकॉर्ड्स