सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील ३ कसोटी सामने झाले असून मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. यादरम्यान एक माहिती समोर येत आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने त्याची जर्सी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला भेट म्हणून दिली आहे.
जडेजाच्या या जर्सीवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सहभागी असणाऱ्या सर्व खेळाडूंची हस्ताक्षर आहे. जडेजाने हा जर्सी एका चॅरिटीसाठी (संस्था) म्हणून दिला आहे. वॉनने त्याच्या सोशल मीडियावर याबाबत एक फोटो शेअर करत माहिती दिली. यावर त्याने “चिअर्स रवींद्र जडेजा या चॅरिटीने खूप पैसा मिळेल,” असे कॅप्शन देखील दिले आहे.
दरम्यान, जडेजा इंग्लंड विरुद्धच्या तीनही कसोटी सामन्यात खेळला होता. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षणात दरम्यान, त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ज्यानंतर त्याला रुग्णालयात देखील नेण्यात आले होते. यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात जडेजाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुखापतीनंतर जडेजाला मैदानात क्षेत्ररक्षणाचा वेळी त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याने गोलंदाजी देखील केली नाही. परंतु, दुसर्या डावात तो फलंदाजीसाठी आला होता. तेव्हा त्याने ३० धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला.
या मालिकेतील पहिल्या २ कसोटी सामन्यात आघाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसरा सामना गमावला. ज्यामुळे आता दोन्ही संघ या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहे. ज्यामुळे भारतीय संघाची सर्वत्र टीका केली जात होती. मात्र, भारतीय संघाच्या या पराभवानंतर विराट कोहलीने संघातील मोठ्या बदलांचे संकेत दिले होते. अशात चौथ्या कसोटी सामन्यात जडेजाला विश्रांती दिली जाऊ शकते.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर २ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–रिषभ पंतच राहणार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार? वाचा संघव्यवस्थापन काय विचार करतायत
–जो रूट अँड कंपनीने लॉर्ड्सच्या पराभवातून घेतला धडा, ‘ही’ चूक सुधारत लीड्समध्ये भारताला केले पराभूत
–ओ शेठ! मेस्सी रोनाल्डोच्या फॅनची अफलातून रिल्स, लाखो व्हूव्जचा पडतोय पाऊस