चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्याने रविवारी (२५ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी करत ३७ धावा केल्या होत्या. तसेच ३ गडी देखील बाद केले होते. याच अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चेन्नई संघाने ६९ धावांनी सामना जिंकत आयपीएलच्या गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठला. जडेजाची फटकेबाजी पाहून त्याची पत्नी रीवा सोलंकीने दिलेल्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावांचा डोंगर उभारला होता. या डावात जडेजाने अवघ्या २८ चेंडूत ६२ धावांची आक्रमक खेळी केली होती. या खेळीत त्याने ५ गगनचुंबी षटकार आणि ४ चौकार लगावले होते. तसेच त्याने हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात तब्बल ३७ धावा कुटल्या होत्या.
हा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी रिवा आणि त्याच्या चिमुकलीनेही स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. जडेजाच्या या खेळीदरम्यान पत्नी रीवाने त्याला चियर करण्यात कुठलीही कमतरता भासू दिली नाही. जडेजाने मारलेल्या प्रत्येक षटकारावर ती उभी राहून चियर करताना दिसून आली. सोशल मीडियावर रीवा चियर करत असल्याचे फोटोज् आणि व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत आहेत.
जडेजाने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली होती. आधी त्याने फलंदाजी करताना तुफानी अर्धशतक झळकावले तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ३ गडी देखील बाद केले होते. तसेच जेव्हा जडेजाने पाचवा आणि शेवटचा षटकार लगावला तेव्हा तो पत्नी रीवाला फ्लाईंग किस देताना देखील दिसून आला होता.
#Jadeja : Engalukum wife iruku
nangalum half century poduvom… kiss um tharuvom.. ????#CSKvRCB pic.twitter.com/QJFpqlHZJV— Vigneshᴿᴱᴰ ᴰᴿᴬᴳᴼᴺ (@Akvicky_2) April 25, 2021
https://twitter.com/lodulalit001/status/1386288946317959171?s=20
विराट कोहलीने केले कौतुक
सामना झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, “प्रत्येकजण त्याची (जडेजाची) क्षमता पाहू शकतो. मला त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहून आनंद होत आहे. दोन महिन्यानंतर तो भारतीय संघासाठी खेळणार आहे. संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडूला चांगली फलंदाजी करताना पाहून नेहमीच तुम्हाला आनंद होतो .जेव्हा तो चांगला खेळतो आणि आत्मविश्वासाने खेळी तेव्हा त्याला बर्याच संधी मिळतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर ओव्हरचा इतिहास: आजवर ‘इतक्यांदा’ आयपीएलमध्ये झाली आहे सुपर ओव्हर; पाहा संपूर्ण यादी
धोनीने जडेजाला ‘तो’ सल्ला दिला नसता, तर त्याने विसाव्या षटकात ३७ धावा चोपल्याच नसत्या!
रविंद्र जडेजाची तुफान फटकेबाजी पाहून धोनीची पत्नी अवाक्; म्हणाली, ‘हा तर जंगली अवतार’






