ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सिडनी कसोटी संपल्यानंतर रवींद्र जडेजा मालिकेला मुकणार असल्याचे वृत्त निश्चित झाले आहे. जडेजा याआधीच मालिकेबाहेर झाल्याची बातमी होती, मात्र बीसीसीआयने त्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. जडेजाला तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना दुखापत झाली होती.
Ravindra Jadeja ruled out of Border-Gavaskar Test series.
More details – https://t.co/ql3fl0a2zO #AUSvIND pic.twitter.com/RFBR0tBvls
— BCCI (@BCCI) January 11, 2021
जडेजाला फलंदाजीदरम्यान डाव्या अंगठ्याला मिशेल स्टार्कने टाकलेला बाऊंसर लागला होता. पण तरीही त्याने फलंदाजी केली होती. मात्र भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले असल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. जडेजाच्या ऐवजी मयंक अगरवालने दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या आगामी बैठकीत सौरव गांगुली नाही घेणार सहभाग, ही व्यक्ती करणार बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व
शर्यतीचा खेळ पडला महागात! पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकच्या कारचा अपघात
रिकी पॉंटिंगची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला भारतीय संघ ब्रिस्बेनला न जाण्याची कारणे शोधत आहे