विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जूनदरम्यान साउथॅम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वात जास्त धावा कोण करणार? तसेच सर्वाधिक बळी कोण टिपणार? यासंदर्भात जगभरातले माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. अशातच ऑस्ट्रेलियन फलंदाज डेविड वॉर्नर याने भारतीय संघाची अपेक्षित प्लेईंग ११ कशी असायला हवी? याबद्दल त्याने आपले मत मांडले आहे.
डेविड वॉर्नरने भारतीय संघातील रवींद्र जडेजाला अंतिम सामन्यासाठी महत्वाचा खेळाडू मानले आहे. डावखुरा फलंदाज जडेजा खालच्या फळीला येवून लांब लांब फटकेबाजी करू शकत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
वॉर्नरने स्पोर्ट्स टुडे सोबत बोलताना सांगिले की, “रवींद्र जडेजाने गेले काही वर्ष डावखुरा फलंदाज म्हणून आणि गोलंदाज म्हणूनही सुंदर कामगिरी केली आहे. तो न्यूझीलंड संघासाठी त्रासदायक ठरेल. इंग्लंडसारख्या परिस्थितीत २ फिरकी गोलंदाज खेळवणे हे तेथील खेळपट्टीला शोभत नाही. परंतु, क्रिकेट जाणकारांनी असे सांगितले आहे की, अश्विन आणि जडेजाची जोडी इंग्लंडच्या खेळपट्टीवर सुद्धा चांगले प्रदर्शन करेल. त्यामुळे आता विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन कोणासोबत मैदानात उतरतो? हे बघणे औत्सुक्याचे असेल.”
इंग्लंडचे वातावरण जवळ जवळ न्यूझीलंडसारखेच असते. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना तिकडच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात फारसा त्रास होणार नाही. तसेच त्यांना इंग्लंडविरुद्ध २ सामन्याची कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाचा पुरेपूर असा सराव झालेला आहे.
त्याविरुद्ध भारतीय संघाला जास्त सराव करण्यास वेळ मिळाला नाही. भारतीय संघाला १० दिवस इंग्लंडमध्ये विलागीकरणात रहावे लागले. म्हणून भारतीय संघाने आपापसात सामना खेळून अंतिम सामन्यासाठी सराव केला. आता भारतीय संघ या सर्व गोष्टींचा सामना करून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर आपले नाव कोरतो का? याची सर्व चाहत्यांना आणि प्रेक्षकांनाही आस लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रेसलर जॉन सीना आहे विराट कोहलीचा चाहता? ‘ती’ पोस्ट पाहून चाहते पडले गोंधळात
भारत-न्यूझीलंडसमोर मोठा प्रश्न, कसोटी चॅम्पियनशीप फायनल सामन्यात येणार ‘हा’ मोठा व्यत्यय?