---Advertisement---

वनडेनंतर आगामी कसोटी मालिकेतूनही जडेजाचा पत्ता कट! ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 6:13 PM
Ravindra-jadeja-Test
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा अजूनही पूर्णपणे फिट झाला नाहीये. याच कारणास्तव त्याला बांगलादेशविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर ठेवले गेले आहे. आता या मालिकेनंतर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतून देखील त्याने माघार घेतली आहे. भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर संघ बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना होईल. 

भारतीय संघाला बांगलादेश दौऱ्यात तीन सामन्यांची एकदविसीय आणि तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. उभय संघांतील एकदविसयी मालिका 4 डिसेंबर रोजी सुरू होणार असून कसोटी मालिकेची सुरुवात 14 डिसेंबरपासून होईल. आशिया चषक 2022 दरम्यान भारताचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) याला गंभीर दुखापत झाली होती आणि याच कारणास्तव त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर जडेजा टी-20 विश्वचषकात देखील खेळू शकला नाही. यादरम्यान त्याच्या गुडघ्याची मोठी शस्त्रक्रिया झाली. सध्या तो दुखापतीतून सावरत आहे.

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या निवड समितीने बांगलादेश दौऱ्यासाठी जडेजाला एकदिवसीय आणि कसोटी संघात सामील केले होते. पण सोबतच असेही सांगितले गेले होते की, जडेजाची फिटनेस पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल. आता जडेजा या दौऱ्यासाठी पूर्णपणे फिट होणार नाही, असे दिसत असल्यामुळे त्याच्या जागी कसोटी संघात उत्तर प्रदेश संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज सौरव कुमार (Sourabh Kumar) याला संधी मिळू शकतो. तत्पूर्वी जडेजाला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय संघात जडेजाच्या जागी यश दयाल (Yash Dayal) याला संधी दिली गेली आहे.

सौरभ कुमारने रणजी ट्रॉफीच्या मागच्या दोन हंगामातील 12 सामन्यांमध्ये 58 विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या हंगामात उत्तर प्रदेश संघाला उपांत्य सामन्यात पोहोचवण्यासाठी देखील सौरभ कुमारची भूमिका महत्वाची राहिली होती. तो न्यूझीलडंविरुद्धच्या मालिकेत भारत अ संघासाठी देखील खेळला आहे, ज्याठिकाणी शेवटच्या सामन्यात त्याने ९ विकेट्स घेतल्या होत्या.

बांगलादेश दौऱ्यासाठी निवडलेला भारताचा एकदिवसीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल.

बांगलादेश दौऱ्यासाठी निवडलेला भारताचा कसोटी संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव. (Ravindra Jadeja is likely to be ruled out of the Test series against Bangladesh)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जम्मू-काश्मीरचा जबरदस्त विक्रम! देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी
क्रिकेटविश्वावर शोककळा! दिग्गज क्रिकेटपटूचे निधन, नशेच्या व्यसनाने उद्ध्वस्त केलं करिअर  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---