---Advertisement---

जडेजाच्या २०० धावा पूर्ण न होण्याला जबाबदार कोण? सचिनचा किस्सा आठवत चाहते म्हणाले…

On: रविवार, मार्च 6, 2022 12:31 AM
Ravindra-Jadeja
---Advertisement---

मोहाली (IND vs SL) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. जडेजाने २२८ चेंडूत नाबाद १७५ धावा केल्या. जडेजाने १७ चौकार आणि ३ षटकार ठोकले. रविचंद्रन अश्विनने ८२ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. शमी २० धावा करून नाबाद परतला. जडेजा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून तो द्विशतक झळकवेल असे दिसत होते, परंतु तसे झाले नाही.

जडेजा हळूहळू द्विशतकाकडे वाटचाल करत असताना कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला. यानंतर चहाचा ब्रेकही घेण्यात आला. रोहितच्या डाव घोषित करण्याच्या निर्णयावर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर चाहते भारतीय संघांचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मावर जोरदार टीका करत आहेत. जडेजाकडे द्विशतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, प्रशिक्षक आणि कर्णधाराने ती पूर्ण होऊ दिली नाही, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

https://twitter.com/36__NotAllOut/status/1500022621819514885?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1500022621819514885%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ravindra-jadeja-missess-double-century-fans-trolls-rahul-dravid-rohit-sharma-4049950.html

https://twitter.com/TheCricketBuddy/status/1500028810288414720?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1500028810288414720%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ravindra-jadeja-missess-double-century-fans-trolls-rahul-dravid-rohit-sharma-4049950.html

ट्विटरवर चाहत्यांनी लिहिले की, २००४ चा दौरा आठवत आहे, जेव्हा भारतीय संघ राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान दौऱ्यावर होता. त्यावेळी मुलतान कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर १९४ धावांवर फलंदाजी करत असताना द्रविड यांनी डाव घोषित केला होता. यावेळी सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. द्रविड त्यावेळी कर्णधार होते आणि आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. युजरने लिहिले, “रवींद्र जडेजाच्या जागी रोहित किंवा विराट कोहली असते, तर त्यांनी डाव घोषित केला असता का?” आणखी एका युजरने लिहिले की, “मी राहुल द्रविडवर पूर्णपणे बहिष्कार करतो, हे अन्यायकारक आहे. रवींद्र जडेजा द्विशतकाला पात्र होता.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा आणि ४०० बळी घेणारा जडेजा हा भारताचा दुसरा क्रिकेटर आहे. यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी भारतासाठी ३५६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी ९०३१ धावा केल्या आहेत. याशिवाय कपिल देव यांनी ६८७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव शेवटी कळलंच; बीसीसीआय देणार उत्तरे

रोहित-विराट यांच्यात आहे का वाद? हा व्हिडिओ पाहून मिळेल उत्तर

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हुकले शतक; मग निराश झालेल्या पंतने केले ‘हे’ काम; व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---