बुधवार रोजी (०९ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याला मोठा फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीनुसार रवींद्र जडेजा याने अष्टपैलूंच्या सूचित दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत झालेल्या मागील कसोटी मालिकेत जडेजाने उल्लेखनीय कामगिरी केली होती व भारतासाठी गोलंदाजी व फलंदाजी दोघांमध्ये आपले सर्वस्व दिले होते.
जडेजाने अष्टपैलूंच्या क्रमवारीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे सोडत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. जडेजाच्या खात्यात आता ३८६ गुण आहेत तर तिसऱ्या क्रमांकावरील बेन स्टोक्स याचे ३८५ गुण आहेत. या सूचित वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर प्रथम स्थानी आहे. भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन आयसीसी कसोटी अष्टपैलूंच्या सूचित ३५३ गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे.
गोलंदाजांची सूची
जर आपण गोलंदाजांच्या सूचीबद्दल बोलायला गेलो तर, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीला सर्वाधिक फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या सूचित टीम साऊथीने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्याआधी टीम साऊथी हा सहाव्या स्थानी होता.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या चांगल्या प्रदर्शनाचे फळ त्यालाही मिळाले आहे. लॉर्ड्सवर झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने त्या सामन्यात ७ विकेट घेतल्या होत्या. यासह तो आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. भारताच्या फिरकीपटू आर अश्विनने ८५० गुणांसोबत या सूचित आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. या सूचित पहिल्या १० जणांमध्ये अश्विन हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
गोलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत पॅट कमिन्स हा ९०८ गुणांसोबत प्रथम स्थानी आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड आहे. न्यूझीलंडचा नील वैगनर हा ८१६ गुणांसोबत पाचव्या स्थानी आहे. त्याच पाठोपाठ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ८०३ गुणांसोबत सहाव्या स्थानी घसरला आहे.
Tim Southee’s seven wickets in the first Test against England has pushed him to No.3 in the @MRFWorldwide ICC Test Rankings for bowling 📈 pic.twitter.com/9nd2ekGiPS
— ICC (@ICC) June 9, 2021
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा १० जूनपासून खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही संघामधील पहिला सामना हा अनिर्णीत राहिला होता. या सामन्यानंतर न्यूझीलंडला १८ जूनपासून भारताविरुद्ध आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. ज्या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे.
महत्वाच्या बातम्या
काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती
‘या’ मोठ्या टी२० लीगला जुलैमध्ये होणार सुरुवात, २२ ऑगस्टपर्यंत चालणार स्पर्धा
भारतीय चाहत्यांची खिल्ली उडवणे मॉर्गन-बटलरला पडणार महागात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून होणार निलंबित?