भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला. या विजयात भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोलाची कामगिरी पार पडली. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली.
सोनी चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत जडेजाने त्याच्या खेळीबद्दल भाष्य केले आणि फलंदाजीदरम्यान केलेल्या योजनेचाही खुलासा केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने (66 धावा) अष्टपैलू हार्दिक पंड्यासोबत (92 धावा) सहाव्या विकेटसाठी 150 धावांची विक्रमी भागीदारी केली. अखेरच्या षटकांत या दोघांनीही केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने 302 धावांची मजल मारली.
माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने या मुलाखतीत रवींद्र जडेजाला विचारले की, “एमएस धोनीला लक्षात ठेऊन तू या सामन्यात फलंदाजी केली का?”
सेहवागच्या या प्रश्नाचे उत्तर देताना जडेजा म्हणाला की, “अगदी बरोबर, माही भाई दीर्घकाळ भारतीय संघाकडून आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. जे फलंदाज खेळपट्टीवर खेळत आहेत त्यानी मोठी भागीदारी करावी, हा पॅटर्न एमएस धोनीने सेट केला आहे. खेळपट्टीवर काही काळ फलंदाजी केल्यावर आपण मोठे फटके खेळू शकतो.”
विशेष म्हणजे जडेजा इंडियन प्रीमियर लीगमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा सदस्य आहे. जडेजाने खुलासा केला की, सामन्याच्या अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहण्याचा सल्ला धोनी नेहमीच देतो. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “अशा परिस्थितीत मी त्याचा सल्ला नेहमीच लक्षात ठेवतो. मी शेवटच्या चार पाच षटकांत जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला.”
https://www.instagram.com/tv/CITE69AhXxm/?utm_source=ig_web_copy_link
हार्दिक पंड्यासोबत केलेल्या विक्रमी भागीदारीबद्दल बोलताना जडेजा म्हणाला, “आजही परिस्थिती तशीच होती. हार्दिक आणि मी सतत चर्चा करत होतो. अखेरच्या 5 षटकांत मोठे फटके मारण्याचे आम्ही ठरवले आणि आमची योजना यशस्वी ठरली.”
महत्त्वाच्या बातम्या –
Video – सात वर्षाच्या चिमुरड्या भारतीय मिस्ट्री स्पिनरची गोलंदाजी पाहून तुम्हीही व्हाल आवाक्
स्मिथ कसोटी क्रिकेटचा ‘किंग’ असला तरी रुट, विलियम्सन अन् कोहली ‘या’ गोष्टीत त्याच्या पुढेच
सामन्यादरम्यान घाबरलेल्या ‘त्या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाला केएल राहुलचा कानमंत्र
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर