आयपीएल 2025 मध्ये खेळाडूंना रिटेन करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अद्याप कोणत्याही संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही. बीसीसीआयने 31 ऑक्टोबरची डेडलाइन निश्चित केली आहे. तत्पूर्वी खेळाडूंच्या रिटेंशनबाबत नाना प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता अशीच माहिती चेन्नई सुपर किंग्जबद्दल समोर आली आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघात कायम ठेवण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जात आहे. जडेजाला सीएसकेने 2022 मध्ये कर्णधार बनवले होते पण त्याला हंगामाच्या मध्यावर काढून टाकण्यात आले होते.
सीएसके जडेजाला सोडणार का?
रवींद्र जडेजा गेल्या 14 वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे (2 वर्षांची बंदी वगळता) आणि त्याने संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा स्थितीत मागील मेगा लिलावाप्रमाणेच या वेळीही जडेजाला संघात कायम राखण्यास प्राधान्य दिले जाईल, असे मानले जात होते. पण आता एका ताज्या अहवालात दावा केला जात आहे की जडेजाला रिलीज केले जाऊ शकते.
सीएसकेने त्याला 2022 मध्ये 16 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले होते, परंतु यावेळी तसे होईल असे वाटत नाही. सीएसकेने जडेजाला संघात कायम ठेवल्यास साहजिकच मेगा लिलावात जडेजाला घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते. मात्र, त्यानंतरही ‘राईट टू मॅच’च्या माध्यमातून सर्वाधिक बोली लावून जडेजाला विकत घेण्याचा पर्याय सीएसकेकडे असेल.
2023 मध्ये चेन्नईला चॅम्पियन बनवण्यात जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना जडेजाने शेवटच्या षटकांमध्ये स्फोटक खेळी खेळली आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सीएसकेला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. जर सीएसकेने जडेजाला रिटेन केले नाही तर संघाचा विद्यमान कर्णधार ऋतुराज गायकवाड रिटेन होणार हे नक्की. म्हणजे त्याला रिटेन्शनमध्ये सर्वाधिक रक्कम मिळेल. त्याच्याशिवाय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मतिशा पाथिरानालाही कायम ठेवण्याची खात्री आहे, तर डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र आणि शिवम दुबे यांच्यापैकी कोणाला कायम ठेवायचे याबाबत सध्या स्थिती स्पष्ट नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025 लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? ‘हा’ संघ पहिल्या क्रमांकावर
‘या’ स्टार खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवडकर्त्यांवर भडकले गावसकर, म्हणाले…
BGT; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवडकर्त्याला झाली कोहली-पुजाराच्या जोडीची आठवण! म्हणाला…