भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेचा इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम संपूर्ण खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे हंगामच्या मध्यातून जडेजाने माघार घेतली होती. परंतु आता आयपीएल संपल्यानंतर जडेजा पूर्वीप्रमाणे फिट झाला आहे. सध्या तो भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याठिकाणाहून जडेजाने भारतीय जर्सी घातलेला एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला खास कॅप्शन देखील दिले आहे.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला होता, पण त्याला ही जाबाबदारी पेलता आली नाही. त्याचे वैयक्तिक प्रदर्शन देखील यावर्षी चांगले नव्हते. आयपीएल हंगामाच्या मध्यातून माघार घेतल्यानंतर जडेजा इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात पुन्हा एकदा मैदानात दिसेल.
या सामन्याच्या आधी जडेजाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो भारतीय संघाच्या निळ्या जर्सीमध्ये दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये जडेजाने लिहिले आहे की, “वेगळ्या जर्सीमध्ये एक नवीन सुरुवात.” त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/p/Ce8c4D1KYe6/
इंग्लंडविरुद्धचा हा कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार असला, तरी त्याआधी भारतीय संघाला त्याठिकाणी एक सराव सामना खेळायचा आहे, ज्यामुळे संघ आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. हा सराव सामना लीस्टरशायर संघाविरुद्ध २४ ते २७ जूनदरम्यान खेळला जाईल.
दरम्यान, आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्याच्या २ दिवस आधी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आणि जडेजाला संघाचा नवीन कर्णधार घोषित करण्यात आले. कर्णधाराच्या रूपात त्याने सुरुवातीच्या आठ सामन्यांमध्ये खूपच निराशाजनक प्रदर्शन केले आणि नंतर कर्णधारपद सोडले देखील. या आठ सामन्यांपैकी सीएसकेला फक्त २ सामने जिंकता आहे होते. जडेजाने कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीला पुन्हा संघाचे नेतृत्व हातात घ्यावे लागले होते. गुणतालिकेत सीएसके संघ यावर्षी खालून दुसऱ्या म्हणजेच ९ व्या क्रमांकावर होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsSA | कर्णधार म्हणून कोहली, धोनीकडूनही जे नाही झाले; ते करत इतिहास रचणार रिषभ पंत
INDvsSA | कर्णधार म्हणून कोहली, धोनीकडूनही जे नाही झाले; ते करत इतिहास रचणार रिषभ पंत