भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांना त्याच्यावर केलेल्या विवादात्मक वक्तव्याबद्दल ट्विट करत सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
भारतीय संघाने 30 जूनला इंग्लंड विरुद्ध 2019 विश्वचषकात पराभव स्विकारल्यानंतर जडेजाचा 2 जूलैला बांगलादेश विरुद्ध अंतिम 11 जणांच्या भारतीय संघात समावेश होईल, अशी चर्चा होती. पण मांजरेकरांनी जडेजाला संघात घेण्यास पसंती दाखवली नव्हती.
त्यांनी आयएएनएसशी बोलताना म्हटले होते की ‘मी थोडी थोडी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा चाहता नाही, जसे सध्या वनडेमध्ये जडेजा कामगिरी करत आहे. कसोटीमध्ये तो पूर्णपणे गोलंदाज आहे. पण वनडेमध्ये मी एका फलंदाजाला आणि एका फिरकीपटूला निवडेल.’
मांजरेकरांच्या या टिप्पणीवर जडेजाने आज ट्विट करत म्हटले आहे की ‘तूम्ही खेळलेल्या सामन्यांपेक्षा मी दुप्पट सामने खेळले आहेत आणि मी अजूनही खेळत आहे. ज्यांनी काहीतरी मिळवले आहे त्यांचा आदर करण्यास शिका. तूमच्या वक्तव्यांबद्दल मी खूप ऐकले आहे.’
Still i have played twice the number of matches you have played and i m still playing. Learn to respect ppl who have achieved.i have heard enough of your verbal diarrhoea.@sanjaymanjrekar
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 3, 2019
2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाने आत्तापर्यंत 8 सामने खेळले आहेत. पण अजून जडेजाला एकाही सामन्यात अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळालेली नाही. मात्र त्याने अनेकदा राखीव क्षेत्रकक्षक म्हणून मैदानात येत चांगले योगदान दिले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या सामन्यानंतर एमएस धोनी घेणार निवृत्ती?
–…म्हणून रोहित शर्माने या चाहतीला भेट दिली स्वाक्षरी केलेली हॅट