चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि संघाचा कर्णधार एमएस धोनी यांच्यातील वाद मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मंगळवारी (23 मे) चेन्नई सुपर किंग्जने क्वॉलिफायर एकमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत केले आणि अंतिम सामन्यात जागा पक्की केली. या सामन्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाला अपस्टॉक्स मोस्ट वॅल्यूएबल प्लेअर ऑफ द मॅच निवडले गेले. जडेजाने ही पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली, पण पोस्टसोबत दिलेले कॅप्शन वादाचा विषय ठरत आहेत.
भारतीय संघाचा 41 वर्षीय माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) अजूनही आयपीएलमध्ये आपली ओगळी ओळख टिकवून आहे. धोनी यावर्षी आयपीएलमध्ये 10वा अंतिम सामना खेळणार आहे. क्वॉलिफायर एकमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सविरुद्ध 15 धावांनी विजय मिळवला. 44 चेंडूत 60 धावा करणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सामनावीर ठरला. तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) अपस्टॉक्स मोस्ट वॅल्यूएबल प्लेअर ऑफ द मॅच ठरला. जडेजाने या सामन्यात 16 चेंडूत 22 धावांची खेळी केली होती. तर गोलंदाजाच्या रूपात 4 षटकात 18 धावा खर्च करून महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या होत्या.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर जडेजाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “अपस्टॉक्सला माहीत आहे… पण काही चाहत्यांना माहीत नाहीये.” जडेजाने सोबतच हासण्याचे दोन इमोजीही शेअर केले आहेत. अष्टपैलू खेळाडूच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अशा चर्चा सुरू झाल्या आहेत की, जडेजाने या पोस्टमधून एकप्रकारे धोनीवरच अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
Upstox knows but..some fans don’t ???????? pic.twitter.com/6vKVBri8IH
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 23, 2023
चाहते नेहमीच एमएस धोनीला पाहण्यासाठी वाट पाहत असतात. अशात धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांकडूने अनेकदा खेळपट्टीवरील फलंदाज बाद होण्याच वाटही पाहिली जाते. आयपीएल 2023 मधील एका सामन्यानंतर जडेजानेही हीच बाब बोलून दाखवली होती. सोबतच काही दिवसांपूर्वी जडेजाने केलेली एक पोस्ट देखील चर्चेत राहिली होती. “आपले कर्म जसे असतील, तसेच आपल्यासोबत होते. लवकर किंवा उशीरा, पण हे होणार नक्कीच,” असे जडेजाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिनेही हे ट्वीट शेअर केले होते.
Definitely ???? pic.twitter.com/JXZNrMjVvC
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 21, 2023
दरम्यान, सीएसके आणि गुजरातमधील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 7 बाद172 धावा केल्या. प्रत्युत्तरा गुजरातचा संघ निर्धारित 20 षटकांमध्ये 157 धावांपर्यंतच मजल मारू शकला. यादरम्यान गुजरातने आपल्या सर्व विकेट्सही गमावल्या. आयपीएलमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा गुजरात टायटन्स संघ सर्वबाद झाला असेल. (Ravindra Jadeja’s new social media post has rekindled the talk of controversy with Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘चिन्ना थाला’कडून धोनीचं तोंडभरून कौतुक; CSK फायनलमध्ये जाताच म्हणाला, ‘तो हात लावेल, ती गोष्ट…’
कसला वाद अन् कशाचं काय! गुजरातला धोबीपछाड देताच धोनीनं जडेजावर उधळली स्तुतीसुमने, लगेच वाचा