भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मनाई केली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 13 जानेवारीला सिडनीमध्ये पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यातील रायडूची गोलंदाजी अवैध(सस्पेक्टेड बॉलिंग ऍक्शन) असल्याचा रिपोर्ट सामना अधिकाऱ्यांनी भारतीय संघाच्या व्यवस्थानपणाकडे दिला होता.
त्यामुळे रायडूची गोलंदाजीची तपासणी ही आयसीसीच्या कसोटी, वनडे आणि टी20तील अवैध गोलंदाजी संबंधी प्रक्रियेअंतर्गत करण्यात आली होती.
त्यासाठी त्याला 14 दिवसांमध्ये चाचणीला सामोरे जावे लागले होते. पण या दरम्यान या चाचणीचा निकाल येईपर्यंत रायडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र तो या दरम्यान चाचणीसाठी उपस्थित न राहिल्याने आयसीसीने रायडूवर 4.2च्या नियमानुसार गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे. त्याच्यावरील ही बंदी जोपर्यंत त्याच्या गोलंदाजी शैलीची तपासणी होत नाही आणि तो जोपर्यंत वैध गोलंदाजीचे प्रदर्शन करत नाही तोपर्यंत कायम राहणार आहे.
पण त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये बीसीसीआयच्या आदेशाने गोलंदाजी करण्याची परवानगी आहे.
JUST IN: Ambati Rayudu has been suspended from bowling in international cricket.
Details 👇https://t.co/n400JyZJdf pic.twitter.com/0QUfFfmnUs
— ICC (@ICC) January 28, 2019
रायडूने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 2 षटके गोलंदाजी केली होती. यात त्याने 13 धावा दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–रोहित-कोहलीची जोडी हिट, केला हा मोठा पराक्रम
–रोहित शर्मा झाला ‘दस हजारी मनसबदार’
–या कारणामुळे एमएस धोनीला बसावे लागले तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर