इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) पंधरावा हंगाम आता अखेरीकडे चालला आहे. गुजरात टायटन्सने प्ले ऑफ गाठली आहे तर, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांचे क्वालिफिकेशन देखील जवळपास पक्के मानले जात आहे. त्याच वेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्ले ऑफ्स गाठणारा चौथा संघ ठरणार का? याविषयी उत्सुकता लागलीये. असे असताना आरसीबीने एक मोठा निर्णय घेतला.
आरसीबीने घेतला मोठा निर्णय
आरसीबीने मंगळवारी (१७ मे) आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी आपण ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना आरसीबीचे पहिले हॉल ऑफ फेम क्रिकेटर्स म्हणून घोषित करत असल्याचे सांगितले. या दोन्ही खेळाडूंनी अनेक वर्ष आरसीबीसाठी आपले योगदान दिले. त्यांच्या योगदानामुळे आरसीबी दोन वेळा आयपीएल फायनलपर्यंत पोहोचली. आज दोघेही संघाचा भाग नाहीत. एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तर, गेल २०१७ नंतर आरसीबीमधून बाहेर झाला होता याप्रसंगी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने त्यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. तसेच दोघांबद्दल काही कौतुकास्पद शब्दही लिहिले गेले.
एबी डिव्हिलियर्सबद्दल लिहीले की, आपला खेळ, प्रतिभा आणि चांगल्या स्वभावाने त्याने सर्वांची मने जिंकली. तर गेलबद्दल लिहिताना त्यांनी म्हटले, गेलने पावर हिटिंगला ओळख दिली. एक इंटरटेनर आणि टी२० चा सर्वश्रेष्ठ बॅटर आज आरसीबीचा हॉल ऑफ फेम बनतोय.
शानदार राहिले करीयर
एबी डिव्हिलियर्सने २०११ ते २०२१ असे तब्बल ११ वर्ष आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने विराट कोहलीसोबत अनेक मॅचविनिंग भागीदार्या केल्या. एबीने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये १८४ आयपीएल सामने खेळताना ५१६२ रन्स काढल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १५१ पेक्षा जास्त राहीला. दुसरीकडे गेलने आयपीएलमध्ये १४२ सामने खेळत ४९६५ रन्स केले. त्यात विक्रमी ६ शतकांचा समावेश आहे. तो २०११ ते २०१७ अशी सात वर्ष आरसीबीचा प्रमुख स्तंभ होता.
महत्वाच्या बातम्या-
‘सीएसके मॅनेजमेंटच्या वागणूकीमुळे नाराज आणि दुःखावलोय’, रविंद्र जडेजा; चेन्नई-जड्डू यांचे ब्रेकअप?
फक्त १० सामन्यांत चहल मोडणार विराटचा ९७३ आयपीएल धावांचा विक्रम? पाहा नक्की काय आहे प्रकरण
मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमारची जागा मिळालेला आकाश मधवाल आहे कोण? जाणून घ्या कामगिरी