रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात हर्षलला दोन विकेट्स देखील मिळाल्या. मात्र, संघाला विजय मात्र त्याला मिळवून देता आला नाही. आरसीबीचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची एक चूक संघाला महागात पडली. तत्पूर्वी हर्षल पटेलकडे देखील सामना सुपर ओव्हरपर्यंत नेण्याची संधी होती. मात्र शेवटच्या चेंडूवर त्यालाही संधीचा फायदा घेता आला नाही.
19 वे षटक संपल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाची धावसंख्या 7 बाद 208 धावा होती. शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी 5 धावा हव्या होत्या आणि तीन विकेट्स देखील हातात होत्या. पण हर्षल पटेल (Harshal Patel) शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला आणि लखनऊसाठी विजय खूपच कठीण होऊन बसला. पटेलने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मार्क वूडचा त्रिफळा उडवला. तर पाचव्या चेंडूवर जयदेव उनाडकडला फाफ डू प्लेसिसच्या हातात झेलबाद केले.
शेवटच्या चेंडूवर आवेश खान स्ट्राईकवर, तर रवी बिश्नोई नॉन स्ट्राईकवर होता. लखनऊला विजयासाठी शेवटची एक धाव आवश्यक होती आणि संघाकडे मागे एकही विकेट शिल्लक नव्हती. अशात हर्षल पटेल शेवटचा चेंडू टाकण्यासाठी धावत आला आणि एक धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राईकवरील बिश्नोई पुढे निघाला. पटेलचे मात्र नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाकडे लक्ष होते. बिश्नोई क्रिजच्या बाहेर निघाल्याचे पाहून त्याने चेंडू फलंदाजाकडे टाकण्याऐवजी स्टंप्सला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हात स्टप्सपर्यंत पोहोचला नाही. नंतर धाव पुढे गेल्यानंतर पटेने पुन्हा चेंडू नॉन स्ट्राईकच्या स्टंप्सवर मारला, पण पंचांनी बिश्नोईला धावबाद दिले नाही. बिश्नोई यावेळीही क्रिजच्या बाहेर होता. पण नियमांनुसार पटेलने चेंडू टाकताना त्या पॉइंटच्या पुढे गेला, जिथून तो नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला धावबाद करू शकतो. याच नियमाच्या आधारे पंचांनी बिश्नोई नाबाद असल्याचा निर्णय दिला.
One of the craziest scenes on the final ball:
LSG needed 1 with just 1 wicket in hand on the final ball. Harshal Patel tried to run out Ravi Bishnoi at the non striker's end, but fumbled.
LSG wins with a bye single! pic.twitter.com/6BBUW4j5wI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2023
शेवटच्या चेंडूवर झालेला हा गोंधळ पाहून चाहत्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. या संपूर्ण प्रकारानंतर हर्षल पटेलला हा चेंडू पुन्हा टाकावा लागला आणि यावेळीही त्याला यश मिळाले होते. स्ट्राईकवरील आवेश खानला शेवटचा चेंडू खेळता आला नाही. पण यष्टीरक्षक दिने कार्तिकने देखील हा चेंडू वेळेत न पकडल्यामुळे फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. परिणामी संपूर्ण सामन्यात चांगले प्रदर्शन करून देखील आरसीबीला पराभवाचे तोंड पाहावे लागले. शेवटच्या षटकात हर्षल पटेलची गोलंदाजी खरोखर कौतुकार पात्र ठरली.
https://twitter.com/Hydrogen_45/status/1645500193239101440?s=20
https://twitter.com/ChinTTan221b/status/1645522727326076933?s=20
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने हे लक्ष्य 9 विकेट्सच्या नुकसानावर आणि डावातील शेवटच्या चेंडूवर गाठले. लखनऊसाठी मार्कस स्टॉयनिसने 65, तर निकोलस पूरनने 62 धावा केल्या. पुरनने अवघ्या 15 चेंडूत म्हणजेच हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक केले. मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल याने दोन, तर कर्ण शर्माने 1 विकेट घेतली. तत्पूर्वी फलंदाजी करताना आरसीबीसाठी फाफ डू प्लेसिस (79), विराट कोहली (61), आणि ग्लेन मॅक्सवेल (59) यांनी अर्धशतके ठोकली. (RCB had to accept the defeat as Harshal Patel missed the chance to Non strike run out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबी अखेरच्या चेंडूवर पराभूत! लखनऊ सुपरजायंट्सने पार केले 213 धावांचे आव्हान, पूरन-स्टॉयनिस ठरले नायक
धोनीची स्टाईल मारायला निघालेला कार्तिक, पण शेवटच्या चेंडूवर बिघडवला सगळा गेम