इंडियन प्रीमियर लीग 2024च्या आपल्या पहिल्या सामन्यात शिखर धवन याने पंजाब किंगसाठी सर्वोत्तम खेळी केली. धवनने 45 धावांची खेळी करत पंजाबला चंगली सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रभसिमरन सिंग, सॅम करण आणि जितेश शर्मा यांनी केलेल्या खेळीमुळे पंजाबने 20 शतकात 6 विकेटच्या नुकासानवर 176 धावांपर्यंत मजल मारली.
आरसीबीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 6 बाद 176 धावा केल्या. यात कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवन याने 37 चेंडूत 45, तर यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा याने 27 धावांची सर्वोत्तम खेळी केली. प्रभसिमरन सिंग याने 17 चेंडूत 25, तर सॅम करण याने 17 चेंडूत 23 धावा कुटल्या. शेवटच्या षटकांमध्ये शशांक सिंग याने 8 चेंडूत 21* धावांची धमकेदार खेळी करत पंजाबला संन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. हरप्रीत बरार याने नाबाद 2 धावा केल्या.
मोहम्मद सिराज याने चार षटकात 26 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन मॅक्सवेल यानेही 29 धावा देत दोन विकेट्स नावावर केल्या. यश दयाल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली
दोन्ही संघांची प्लेयिंग इलेवेन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टिरक्षक), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
पंजाब किंग्ज –शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर
महत्वाच्या बातम्या –
हंगामातील पहिल्या विजयासाठी आसीबीला 177 धावांचे लक्ष्य, शशांक सिंगकडून झंझावाती शेवट
रत्नागिरी संघावर मात देत सांगली संघ पाचव्या स्थानावर