इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे पर्व तोंडावर आले आहे. ९ एप्रिल रोजी चेन्नई मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नई येथे या पर्वातील पहिला सामना रंगणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली बंद दाराआड आयपीएलचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत. मात्र हंगामाची सुरुवात होण्यापुर्वीच मैदानावर कोविड-१९ चे आगमन झाले आहे. नुकताच बेंगलोर संघाचा युवा शिलेदार देवदत्त पड्डीकल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर पड्डीकलला संघातील सर्व खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.
पड्डीकल बेंगलोर संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. त्यामुळे त्याला कोरोनाची बाधा झाल्याने बेंगलोर संघाच्या चिंतेत भर पडली आहे. गतविजेत्या मुंबईविरुद्ध होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्याला तो मुकण्याची दाट शक्यता आहे.
NEWS ALERT: RCB opener Devdutt Padikkal has been tested positive for COVID-19. #IPL #IPL2021
— CricTracker (@Cricketracker) April 4, 2021
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोर संघ पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहे. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये बेंगलोरने अंतिम फेरीत धडकही मारली होती. परंतु त्यांना तिन्हीवेळीही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गतवर्षीही दमदार कामगिरीनंतर त्यांनी प्लेऑफपर्यंत मजल मारली होती.
मात्र इलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या हातून पराभूत झाल्याने त्यांना अंतिम सामन्यापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे विजयासाठी आसुललेला बेंगलोर संघ यंदा चषक जिंकण्यासाठी अथक परिश्रम करताना दिसेल.
The moment we've all been waiting for! The fixtures for #IPL2021 are out! 🤩
Which RCB game are you looking forward to the most, 12th Man Army?🤔#PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/WXj353JQqc
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 7, 2021
असे आहेत आयपीएल २०२१ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे साखळी फेरीतील सामने-
९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७० वाजता
१४ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल- चेन्नई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी ३.३० वाजता
२२ एप्रिल – मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – मुंबई, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
२७ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
३० एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
३ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
६ मे – अहमदाबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – कोलकाता, राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – २२ खेळाडू (८ परदेशी)
विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनिएल सॅम्स, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तीन, सचिन बेबी, रजत पाटिदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभुदेसाई, कोना श्रीकर भरत