शुक्रवार (9 एप्रिल) म्हणजे आजपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामास सुरूवात होणार असून सर्वच संघातील खेळाडू आपली चमकदार कामगिरी दाखविण्यासाठी आतुर झाले आहेत. या पर्वातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. तत्पुर्वी बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा पूर्णपणे लयमध्ये असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचे मनोबल उंचावले आहे. अशात त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवसांचा उल्लेख केला.
आरसीबीच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यानिमित्त तिथे गेल्यानंतर आम्हाला सराव सत्र ते हॉटेलपर्यंत सर्वत्र जैव सुरक्षित वातावरणाचे कठोर पालन करायचे होते. कोणीही कोणाला भेटू शकत नव्हते. आम्ही सराव करुन परतलो आणि मला माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली. यावेळी मला काय करावे सूचतच नव्हते. मग मी माझ्या आईसोबत फोनवर बोललो. त्यावेळी आईने मला सांगितले की, तु देशासाठी खेळावे असे तुझ्या वडिलांचे स्वप्न होते. त्यामुळे तु तिथेच राहून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण कर.”
तसेच तो म्हणाला की, “मला भारतासाठी तिन्ही स्वरूपामध्ये क्रिकेट खेळायचे असून भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज व्हायचे आहे. खेळाच्या मैदानावर मला जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांचे खूप सहकार्य लाभले असून दोघेही माझ्यासाठी आदर्श आहेत. जेव्हा जेव्हा मी गोलंदाजी करायचो तेव्हा जसप्रीत बुमराह माझ्यामागे उभा राहून गोलंदाजी संबंधित मार्गदर्शन करायचा. तो म्हणायचा की, नेहमी मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिले गेले तर जास्त काहीही करण्याची गरज नाही.”
“जेव्हा पहिल्यांदाच मी आरसीबी संघामध्ये आलो, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. परंतु नंतर नव्या चेंडूवर गोलंदाजीचा सराव करून मी स्वत:वरील ताण कमी केला. एकाच विकेटवर सतत गोलंदाजी केल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. संघातील वातावरण इतके चांगले होते की, सर्व खेळाडू एकमेकांना भेटत असत व एकमेकांशी मनमोकळे बोलत होते,” असे सिराजने सांगितले.
Bold Diaries: Mohammed Siraj 2.0
Siraj talks about his Indian team debut, how he regained his confidence during last year’s IPL, goals for this season and much more, on @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/pcSRgy6OQu
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 8, 2021
आपल्या गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याबद्दल बोलताना मोहम्मद सिराज म्हणाला की, “अरुण सर मला आपल्या मुलाप्रमाणे मानतात. मी जेव्हाही त्यांच्याशी बोलतो तेव्हा माझे मनोबल उंचावते. जेव्हा ते हैदराबादमध्ये होते तेव्हा ते मला नेहमी लाइन आणि लेंथवरती लक्ष केंद्रित करण्यास सांगायचे.”
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ चा उद्घाटन सोहळा ठरणार खास, पहिल्यांदाच दिसणार ‘हे’ विशेष दृश्य
MI आणि RCB आज येणार आमने सामने, कुठे व केव्हा होणार पहिला आयपीएल सामना; जाणून घ्या सर्वकाही
मुंबईकरांची खैर नाही! आरसीबीच्या मोठ्या गोलंदाजाने हार्दिक आणि पोलार्डला बाद करण्याची बनवलीय योजना