---Advertisement---

IPL 2025: चेपॉक स्टेडियममध्ये धोनीसमोर ‘RCB-RCB’ चा जल्लोष, व्हिडिओ व्हायरल!

On: शनिवार, मार्च 29, 2025 1:25 PM
---Advertisement---

शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला. चेपॉकमध्ये होणाऱ्या प्रत्येक सामन्यात संपूर्ण स्टेडियम पिवळ्या रंगाचा दिसतो. ‘सीएसके, सीएसके’ च्या जयघोषाने स्टेडियम दुमदुमले पण शुक्रवारी दृश्य वेगळे होते. एमएस धोनीसमोर स्टेडियममध्ये ‘आरसीबी, आरसीबी’च्या घोषणा देण्यात आल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

197 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच संघ खूपच संथ खेळत होता. कर्णधारासह त्यांचे अव्वल फलंदाज लवकर बाद झाले. अशा परिस्थितीत, आरसीबी विजयाकडे वाटचाल करत होता आणि चेपॉकवर सीएसके चाहते निराश झाले होते. पण तिथे उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने चाहत्यांनी ‘आरसीबी आरसीबी’ च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी बनवलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट कोहलीमुळे चाहत्यांना आरसीबी संघही आवडतो.

197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. राहुल त्रिपाठी (5) नंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड (0) जोश हेझलवूडने स्वस्तात बाद केला. यानंतर, दीपक हुडा 4 धावा काढून भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. एका टोकाला, रचिन रवींद्रला थोडा वेळ संघर्ष करावा लागला पण 13 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यश दयालने त्याला बाद केले, ज्यामुळे सामना एकतर्फी झाला. रचिनने 31 चेंडूत 41 धावा केल्या.

आरसीबीकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकांत फक्त 21 धावा दिल्या. यश दयालने 3 षटकांत 18 धावा देत 2 बळी घेतले. लियाम लिव्हिंगस्टोनने 4 षटकांत 28 धावा देत 2 बळी घेतले. भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली.

शेवटच्या षटकात एमएस धोनी फलंदाजीला आला पण तोपर्यंत सामना सीएसकेच्या हातातून जवळजवळ निसटला होता. धोनी 16 चेंडूत 30 धावा काढून नाबाद राहिला, त्याने शेवटच्या षटकात 2 षटकारही मारले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 196 धावा केल्या. ज्यात सलामीवीर फिल साॅल्टने 32 आणि विराट कोहलीने 31 धावा केल्या. संघाकडून कर्णधार रजत पाटीदार (51) सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---