---Advertisement---

फॅन्टॅस्टिक फाफ! 38 व्या वर्षीही प्लेसिस घालतोय आयपीएलमध्ये धुमाकूळ, अविश्वासनीय सातत्याने राखलीये ऑरेंज कॅप

---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 32वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात रंगला. सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीचे नेतृत्व विराट कोहली याने केले. सलामीला फलंदाजी करताना नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी पुन्हा एकदा संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत संघाला मजबूत स्थितीत नेणारी खेळी केली. त्यासोबतच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो पहिल्या स्थानी कायम राहिला.

या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तसेच शाहबाज अहमद याला देखील संधीचे सोने करता आले नाही. त्यानंतर मात्र प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी अक्षरशः राजस्थानच्या गोलंदाजांना घाम फोडला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी तब्बल 127 धावा जोडल्या. प्लेसिसने 39 चेंडूवर 62 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. तर दुसरीकडे मॅक्सवेलने 47 चेंडूत 77 धावा करताना 6 चौकार व 4 षटकार ठोकले.

 

संपूर्ण हंगामात त्याची बॅट चांगलीच बोलताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळताना त्याने 43 चेंडूवर 73 धावा केल्या होत्या. त्यानंतर केकेआरविरुद्ध त्याला 23 धावा करण्यात यश आलेले. लखनऊविरुद्ध तिसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपला प्रभाव पाडताना 79 धावांची खेळी केली होती. दिल्लीविरुद्ध त्याची सर्वात निच्चांकी 22 धावा त्याने केल्या. चेन्नईविरुद्ध पाठीची दुखापत असताना देखील 33 चेंडूंवर 62 धावा त्याने केलेल्या. तसेच पंजाबविरुद्ध झालेल्या अखेरच्या सामन्यातही त्याच्या बॅटमधून सर्वोच्च 84 धावांची खेळी आली होती.

सध्या प्लेसिस 68 वर्षांचा असून त्याने चालू हंगामात सात पैकी पाच सामन्यात अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजाला देण्यात येणारी ऑरेंज कॅप त्याच्याच डोक्यावर असून, त्याच्या नावे तब्बल 405 धावा आहेत.

(RCB Skipper Faf Du Plessis Another Half Century Strong His Orange Cap Position In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘तो पंड्या नेतृत्वात स्मार्ट, पण लखनऊ…’, पराभवानंतर दिग्गजाने पुन्हा साधला राहुलवर निशाणा
संजूच्या ‘रॉयल्स’ने जिंकला टॉस, RCB संघ विराटच्याच नेतृत्वाखाली देणार ‘टॉपर’ला झुंज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---