वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये शनिवारी (18 मार्च) दिवसातील दुसरा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा खेळला गेला. सुरुवातीला गुजरातने तुफानी फलंदाजी करत 188 धावा उभ्या केल्या. मात्र, आरसीबीची अनुभवी सलामीवीर सोफी डिवाईन हिने हे लक्ष अगदी दुबळे ठरवले. झंझावाती फलंदाजी करताना तिने स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या उभारली. स्पर्धेतील पहिल्या शतकापासून अवघी एक धाव दूर असताना ती बाद झाली.
WHAT. AN. INNINGS. 🔥
The whole stadium applauds! We are in disbelief but Sophie has to depart. 💔#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2023 #RCBvGG pic.twitter.com/JRWFztHO1i
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 18, 2023
गुजरातने या सामन्यात 189 धावांचे आव्हान आरसीबी समोर ठेवले. या धावांना प्रत्युत्तर देताना आत्तापर्यंत अपयशी ठरलेल्या कर्णधार स्मृती मंधाना व सोफी डिवाईन या सलामी जोडीने अक्षरशः मैदानावर षटकार चौकारांचा पाऊस पाडला. स्मृतीने 31 चेंडूवर 35 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या बाजूने डिवाईन थांबण्याचे नाव घेत नव्हती. तिने सर्वच गोलंदाजांचा येथेच्छ समाचार घेत 99 धावांची खेळी केली. बाद होण्यापूर्वी तिने 36 चेंडूवर 9 चौकार व 8 षटकारांचा पाऊस पाडला. ही स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली.
यापूर्वी वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या युपी वॉरियर्झची कर्णधार एलिसा हिलीच्या नावे होती. तिने 95 धावांची नाबाद खेळी केली होती. डिवाईन हिच्याच नावे आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 36 चेंडूवर शतक झळकावण्याची कामगिरी देखील नोंद आहे. यापूर्वी एकदा सोफी टी20 सामन्यात 99 धावांवर देखील नाबाद राहिली आहे. 2019 बिग बॅश लीगमध्ये तिच्यावर ही वेळ आली होती.
वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये 99 धावांवर बाद होणारी ती पहिली फलंदाज असली तरी, आयपीएलमध्ये पाच फलंदाज याच धावसंख्येवर बाद झाले आहेत. यामध्ये ख्रिस गेल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, पृथ्वी शॉ व इशान किशन यांचा समावेश आहे.
(RCB Sophie Devine Hits Record Breaking 99 In WPL 2023 Against Gujarat Giants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीसंतच वेगळंच असतं! आयपीएलसाठी पाठिंबा एका संघाला आणि जिंकण्याची प्रार्थना दुसऱ्या संघासाठी
महिला आरसीबीच्या सुमार खेळीसाठी विराट, डिविलियर्स आणि ‘हा’ दिग्गज जबाबदार? माजी गोलंदाजाचे मोठे विधान