इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये आज (रविवार, १८ एप्रिल) पहिल्यांदा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. दुपारी ३.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
मागील सलग २ सामने जिंकत विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या हातून मागील सामन्यात दारुण पराभवाला सामोरे गेलेला केकेआर (कोलकाता नाईट रायडर्स) संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या हेतूने मैदानावर उतरेल. या सामन्यात कर्णधार कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी असेल.
या सामन्यात कोहलीने ५६ धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये ६००० धावा करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरेल. आतापर्यंत त्याने १९४ आयपीएल सामने खेळताना ५९४४ धावा चोपल्या आहेत. परंतु हा किर्तीमान आपल्या नावे करण्यासाठी त्याला मागील ६ सामन्यातील नकोशी मालिका खंडित करावी लागणार आहे. त्याला मागील ६ आयपीएल सामन्यात एकदाही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
असे असले तरीही, विराटचे कोलकाता संघाविरुद्धचे प्रदर्शन शानदार राहिले आहे. आयपीएल २०१८ पासून कोलकाताविरुद्ध त्याची फलंदाजी सरासरी ५० पेक्षा जास्त राहिली आहे. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही उल्लेखनीय १४६ इतका राहिला आहे. त्यामुळे विराट आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावत आयपीएलमधील ६००० धावांचा आकडा गाठण्याची दाट शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, वॉशिंग्टन संदर, हर्षल पटेल, कायल जेमीसन, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, डॅनियल क्रिश्चियन
कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग:
शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, ऑयन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंह, प्रसिद्ध कृष्णा
महत्त्वाच्या बातम्या-
‘एवढ्या युवा खेळाडूंना घेऊन खेळल्यानंतर पराभव होणारचं होता,’ दिग्गजाचा कर्णधार वॉर्नरवर निशाणा
तब्बल ६ फूट ८ इंच उंचीच्या गोलंदाजाला कॅप्टन कोहलीचे ‘हे’ गुण करायचे आहेत अवगत