विराटकडून राशिद खानला खास गिफ्ट; भावाने Video व्हिडिओ शेअर करत मानले आभार

विराटकडून राशिद खानला खास गिफ्ट; भावाने Video व्हिडिओ शेअर करत मानले आभार

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू नेहमीच एकमेकांना आपल्या जवळची खास वस्तू इतर खेळाडूंना भेट म्हणून देत असतात. आपल्याला याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. असंच काहीसं पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने गुजरात टायटन्स संघाचा अष्टपैलू राशिद खान याला आपली एक गोष्ट भेट म्हणून दिली आहे. राशिदने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे.

खरं तर विराट कोहली (Virat Kohli) याने त्याची स्वत:ची बॅट राशिद खान (Rashid Khan) याला दिली आहे. राशिदने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या जर्सीत पॅड घालून दिसत आहे. दुसरीकडे, राशिददेखील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या जर्सीत दिसत आहे. दोन्ही संघ गुरुवारी (दि. १९ मे) वानखेडे स्टेडिअममध्ये एकमेकांचा सामना करणार आहेत. बेंगलोर संघाला प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.

राशिदने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “तुला भेटून नेहमीच चांगले वाटते विराट कोहली. या भेटीसाठी खूप खूप धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19) 

राशिदने या व्हिडिओत तसे स्पष्ट सांगितले आहे की, विराटने त्याला काय गिफ्ट दिले आहे. मात्र, तो व्हिडिओच्या सुरुवातीला बॅटकडे पाहत आहे. आधी विराट चेंडू खेळण्याची ऍक्शन करतो. त्यानंतर राशिदही त्याचे अनुकरण करताना दिसतो. यावरून समजते की, विराटने आपल्या मित्राला खास भेट दिली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच पक्के केले आहे. तो या हंगामातील सर्वात यशस्वी संघ आहे. हार्दिक पंड्याने या हंगामात पहिल्यांदाच कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. तसेच, तो ही जबाबदारी लिलया पार पाडताना दिसत आहे. दुसरीकडे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीचा हा पहिलाच हंगाम आहे. राशिद खान गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. यंदा तो गुजरातच्या ताफ्यात आहे.

भले शाब्बास! आता गेल अन् डिविलियर्ससोबत घेतलं जाणार क्विंटन डी कॉकचं नाव, पाहा त्याचा पराक्रम

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.