आयपीएल २०२२ च्या ३१ व्या सामन्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स आमने सामने होते. आरसीबीने सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि डावाच्या पहिल्याच षटकात त्यांच्या दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या. आरसीबीला तिसरा झटका ग्लेन मॅक्सवेलच्या रूपात मिळाला. वेस्ट इंडीजचा गोलंदाजी अष्टपैलू जेसन होल्डरने एक उत्कृष्ट झेल घेत मॅक्सवेलला तंबूत माघारी पाठवले.
लखनऊकडून पहिले षटक दुश्मंता चमीराने टाकले आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. पहिल्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर चमीराने सलामीवीर अनुज रावत आणि माजी कर्णधार विराट कोहलीची विकेट घेतली. कर्णधार फाफ डू प्लेसिस मात्र दुसऱ्या बाजूने संयमी खेळी खेळत होता. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि षटकातील तिसऱ्या षटकात त्याने ३ चौकारांसह एक षटकार मारला. परंतु ५ व्या षटकात त्याने विेकट मगावली.
अष्टपैलू कृणाल पांड्याने ५ व्या षटकात गोलंदाजी केली. कृणालने टाकलेला चेंडू मॅक्लवेलने रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण तो शॉट बॅटवर नीट आला नाही आणि परिणामी त्याला विकेट गमवावी लागली. चेंडू त्याच्या बॅटला लागून शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने गेला. तसे पाहिले तर, मॅक्सवेल अनेकदा रिवर्स स्वीपवर अनेकदा धावा घेत असतो, पण यावेळी ते शक्य झाले नाही. यावेळी खेळलेला रिवर्स स्वीप शॉट क्षेत्ररक्षक जेसन होल्डर (Jason Holder) याने डाव्या बाजूला डाईव्ह मारून चेंडू पकडला.
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1516423861633490961?s=20&t=vc7NcEINnFZzbP1LgrbKqw
Terrific catch by Jason Holder. Great commitment. #IPL2022 #LSGvsRCB pic.twitter.com/2gGjwVE3RJ
— Crazy cricket 🏏 (@iamsagar17_) April 19, 2022
यावेळी होल्डरच्या जागी जर दुसरा एखादा क्षेत्ररक्षक असता, तर त्याला कदाचित हा झेल घेणे शक्यतो जमले नसते. पण होल्डरने हे करून दाखवले. त्याची उंची २ मीटरपेक्षा जास्त आहे, ज्याचा त्याला नेहमीच फायदा होत आला आहे. मॅक्सवेलने सामन्या ११ चेंडू खेळले आणि २३ धावा करून बाद झाला.
MUST WATCH: A full stretched dive from @Jaseholder98 cuts short Glenn Maxwell's enterprising run.
📽️📽️https://t.co/91RqQnk9pi #TATAIPL #LSGvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2022
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर आरसीबीने नाणेफेक गमावल्यामुळे त्यांनी सुरुवातीला फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ६ विकेट्सच्या नुकसानावर १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने ८ विकेट्सच्या नुकसानावर १६३ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्याा –
हसू की रडू? पहिल्याच चेंडूवर विकेट गमावल्यानंतर विराटने दिले असे हावभाव, रिऍक्शन व्हायरल
आमदार चषक राज्यस्तरीय ज्यूनियर ज्यूदो स्पर्धा २१ एप्रिलपासून
अनिल जी रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग २०२२ स्पर्धेत १० संघ सहभागी