---Advertisement---

आरसीबीचा ‘हा’ खेळाडू अडकणार विवाह बंधनात, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता

On: बुधवार, मार्च 24, 2021 4:23 PM
---Advertisement---

नुकतेच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने लग्नगाठ बांधली. त्याने पेशाने मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर असणार्‍या संजना गणेशनशी विवाह केला. त्यामुळे बुमराह गेल्या काही सामन्यांपासून भारतीय संघापासून दूर आहे. येत्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतांना तो मैदानावर परतलेला दिसेल.

आता बुमराहनंतर आयपीएलमधील अजून एक खेळाडू लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा खेळाडू मुंबई इंडियन्सचा नसून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून, बंगलोरचा लेगस्पिनर अॅडम झाम्पा आहे.

आयपीएलच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता
अॅडम झाम्पा एप्रिल महिन्यात लग्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर तो संघात दाखल होऊ शकतो. याबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी माहिती दिली.

एका व्हिडिओत ते म्हणाले, “अॅडम झाम्पा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याच्यासाठी हा खास क्षण आहे. आयपीएल फ्रॅन्चायझी म्हणून आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तसेच तो लवकरच संघासह जोडला जावा, अशीही आशा आम्ही व्यक्त करतो.”

दरम्यान, येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात होईल. मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा युएई मध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र यंदा भारतातच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे अद्याप एकही विजेतेपद पटकावता न आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ यंदा ते मिळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल.

महत्वाच्या बातम्या:

विराटच्या त्या वक्तव्यावर संजय मांजरेकरांनी साधला निशाणा, म्हणाले

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत हे खेळाडू आहेत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत

धक्कादायक! मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूच्या वडीलांनी घेतला जगाचा निरोप,काही सामने खेळाडू असणार संघाबाहेर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---