येत्या एप्रिल महिन्यात भारतात आयपीएल स्पर्धेचे आगमन होणार आहे. ९ एप्रिलपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांनी सरावाला सुरुवात देखील केली आहे. या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये रंगणार आहे. परंतु या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई संघातील दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे या खेळाडूचे आयपीएल स्पर्धा खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार आणि आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करणारा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डच्या वडिलांचे निधन झाले आहे. या दुःखद घटनेची माहिती त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.
त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबत असलेला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचे वडील आणि तो आयपीएल ट्रॉफी सोबत दिसून येत आहे. यासोबतच त्याने कॅप्शन देखील लिहिले आहे की,” मला माहित आहे तुम्ही जिथे कुठेही असाल चांगल्याच ठिकाणी असाल. तुम्ही बर्याच लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. मी तुम्हाला नेहमीच अभिमान वाटेल असेच काम करेल.”
सचिन तेंडुलकर ने देखील ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
भारतीय संघातील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने देखील ट्विट करत पोलार्डच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने लिहिले, “मला नुकतेच कळाले की,तुमचे वडील या जगात नाही राहिले. मी तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांसाठी मनापासून दु:ख व्यक्त करतो. देव तुम्हाला यातून बाहेर येण्याचे बळ देवो.”
Just got to know about the demise of your father @KieronPollard55.
My deepest condolences to you & all your family members in this hour of grief.May God give you the strength to overcome this loss.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 24, 2021
पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा जर रोहित शर्मा सामन्यासाठी अनुपस्थितीत असेल तर पोलार्ड मुंबई संघाचे नेतृत्व करतानाही दिसतो. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात दु:खद घटना घडली असल्या कारणाने तो आयपीएलसाठी भारतात कधी येणार यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कारण परदेशी खेळाडू तसेच भारतीय खेळाडूंनाही आयपीएलसाठी बायोबबलमध्ये प्रवेश करण्याआधी क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे जर पोलार्डला काही काळ उशीर झाला तर तो सुरुवातीचे काही सामने मुकू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘असं’ झालं तर इंग्लंडला मागे टाकत भारतीय संघ वनडे क्रमवारीत येईल अव्वल क्रमांकावर
पंड्या बंधूंनी सामन्यापूर्वी वडिलांच्या ‘या’ ३ गोष्टी नेल्या होत्या ड्रेसिंग रूममध्ये