बार्सिलोना आणि रियल माद्रिद यांच्यात हंगामापूर्वी मैत्रीपूर्व सामना रंगला. ऑलजायंट स्टेडियम, लास वेगास येथे रविवारी (२३ जुलै) झालेल्या या एल क्लासिकोच्या सामन्यात बार्सिलोनाने १-० असा विजय मिळवला आहे.
सामन्याच्या २८व्या मिनिटाला राफिन्हाने (Raphinha) केलेला गोल सामनाविजयी ठरला आहे. त्याचे आता २ सामन्यात २ गोल झाले आहेत. ब्राझिलच्या या खेळाडूने डाव्या पायाने मारलेली कीक इतकी ताकदवान होती की रियलचा गोलकिपर थिबाउट कुर्टोसिसकडे तो गोल होण्यापासून बचाव करण्याची काहीच संधी नव्हती.
या सामन्यात पहिल्या सत्रात बार्सिलोना आक्रमक दिसली. या सामन्याचा ४५ मिनिटांचा खेळ संपला असता बार्सिलोना १-० अशी आघाडीवर राहिली. तर ४७ व्या मिनिटाला लेवाडोस्कीचे पदार्पण विना गोल केल्याने संपले. त्याच्याजागी औबामेयांग बदली खेळाडू म्हणूल आला.
💥 BOOOOOOOOM!!!! GOAL BARÇA! RAPHINHA GETS THE FIRST! 0-1! #ELCLÁSICO 🇺🇸 pic.twitter.com/zDEdmbwEXu
— FC Barcelona (@FCBarcelona) July 24, 2022
दुसऱ्या सत्रात मागे पडलेल्या रियलने गोल करण्याचे अनेक प्रयत्न करत त्यांच्या खेळ उंंचावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बार्सिलोनाचा बचाव आणि रियलच्या संघात केरिम बेन्झेमा (Karem Benzema) अनुपस्थित असल्याने त्यांचा खेळ कमी पडला. तसेच या सत्रात बार्सिलोनाचा प्रशिक्षक झावीने गोलकिपर टेर स्टेजनच्या जागी इनाकी पेनाला आणले. सामना संपण्यास ३ मिनिटे बाकी असताना दोन्ही संघाने काहीसा आक्रमक खेळ करत गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपूरा पडला.
🍿 Barça capture #ElClásico in Las Vegas! pic.twitter.com/2kIYdS8Wy1
— FC Barcelona (@FCBarcelona) July 24, 2022
रियलकडून खेळणारा एडन हॅझार्डही अंतिम अकरामध्ये दिसला मात्र चेल्सी आणि रियलसाठी खेळणारा या बेल्जियमच्या खेळाडूमध्ये मागील काही सामन्यांपासून खूप मोठे बदल दिसले आहेत. तो वारंवार गोल करण्यात अपयशी ठरत आहे. या सामन्यातही असेच काहीसे झाले आहे.
या सामन्यात रियल माद्रीद (Real Madrid) आणि बार्सिलोना (Barcelona) ४-३-३च्या फॉर्मेशनने खेळली. तर बार्सिलोनाने इंटर मियामीला ०-६ने पराभूत केले होते त्या संघात ६ बदल केले. रोनाल्ड अरायूजो, जॉर्डी एल्बा, गावी, सर्जियो बस्क्वेक्ट्स हे संघात परतले, तर औबामेयांगबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. त्याच्याजागी पोलंडचा स्टार खेळाडू रॉबर्ड लेवानडोस्किने (Robert Lewandowski) बार्सिलोनाकडून पदार्पण केले आहे. हा सामना खेळण्यापूर्वी बार्सिलोनाने या दौऱ्यात ३ सामने खेळले आहेत. तर रियलचा हा पहिलाच सामना होता.
अमेरिकेत एलक्लासिकोचा सामना होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०१७मध्ये हे दोन संघ मियामी गार्डन्स, प्लोरिडाच्या हार्ड रॉक स्टेडियमवर आमनेसामने आले होते. त्यावेळीही बार्सिलोनाने सामना जिंकला होता. हा सामना बार्सिलोनाने ३-२ने जिंकला होता
यावर्षी अनेक युरोपियन फुटबॉल क्लब अमेरिकेत खेळत आहेत. सॉकर चॅम्पियनशीपच्या हा दौरा कोरोनामुळे अधिक प्रवास होऊ नये यासाठी आयोजित करण्यात आला आहे. १६ जुलैपासून सुरू झालेला हा दौरा ३० जुलैपर्यंत चालणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत पाकिस्तानच्या क्रिकेटला एकत्र आणणार ‘हा’ देश, आता सामना खेळण्यासाठी आयसीसीची गरज नाही
क्रिकेटर मोहम्मद शमीच्या दारात आलिशान ‘जॅग्वार’, खरेदी केली ९८ लाख रुपयांची कार
अबब! एकट्यानेच चोपल्या ४५० चेंडूत नाबाद ४१० धावा; १८ वर्षानंतर झाली लारासारखी कामगिरी