---Advertisement---

…म्हणून विकेट घेतल्यानंतर सलामी देत सेलिब्रेशन करतो शेल्डन कॉट्रेल

---Advertisement---

नॉटिंगहॅम। आज(6 जून) 2019 विश्वचषकातील 10 वा सामना विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु आहे. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत विंडीजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवातीला नियंत्रित ठेवले होते.

विंडीजकडून सुरुवातीलाच ओशोन थॉमसने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला(6) बाद केले. त्याच्या पाठोपाठ शेल्डन कॉट्रेलने डेव्हिड वॉर्नरला 3 धावांवर बाद केले. त्यानंतर आंद्रे रसलने उस्मान ख्वाजाचा(13) अडथळा दूर केला. तर कॉट्रेलने त्याच्या पुढच्याच षटकात मॅक्सवेलला शून्यावर बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आवस्था 7.4 षटकात 4 बाद 38 धावा अशी झाली.

कॉट्रेलने वॉर्नर आणि मॅक्सवेलला बाद केल्यानंतर त्याच्या खास शैलीत सलामी ठोकत सेलिब्रेशन केले. त्याचे असे सेलिब्रेशन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पहायला मिळाले होते. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आयसीसीनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कॉट्रेलने त्याच्या या सेलिब्रेशनबद्दल यावर्षाच्या सुरुवातीला बीबीसीशी बोलताना सांगितले होते की ‘ही मिलिटरी स्टाईल सलामी आहे. मी व्यवसायाने जवान आहे. मी सलामी देतो ते फक्त जमैकाच्या संरक्षण दलाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी.’

‘मला जेव्हाही विकेट मिळते तेव्हा मी सलामी देतो. मी जेव्हा सैन्यात ट्रेनिंग घेत होतो तेव्हा या सलामीचा सहा महिने सराव केला आहे.’

https://twitter.com/cricketworldcup/status/1136572365045981186

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

हिटमॅन रोहित शर्माच्या शतकी खेळीबद्दल कर्णधार कोहली म्हणाला…

काय सांगता! डिविलियर्सला खेळायचा होता २०१९ चा विश्वचषक, पण…

विश्वचषक २०१९: न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने मोडला ब्रेट लीचा तब्बल १५ वर्षांपूर्वीचा विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment