---Advertisement---

अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात ‘मिस्ट्री स्पिनर’ चक्रवर्तीला डच्चू मिळण्यामागे ‘हे’ होते प्रमुख कारण

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 12:15 PM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत आणि अफगानिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. भारतीय संघाला या स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. कारण स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने १० गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात वरूण चक्रवर्तीला संघाबाहेर करून आर अश्विनला संधी देण्यात आली होती. काय आहे यामागील कारण जाणून घ्या.

वरूण चक्रवर्तीच्या न खेळण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेल्या विधानात म्हटले की, “वरुण चक्रवर्तीच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. या सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता.” वरूण चक्रवर्तीची पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्धची कामगिरी पाहता तो फिट असता तरीदेखील त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नसती.

गेल्या काही दिवसांपासून आर अश्विनला संघात संधी देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे निर्णायक सामन्यात वरूण चक्रवर्ती ऐवजी आर अश्विनला संधी दिली गेली होती. आर अश्विनने या सामन्यात मोलाचे योगदान योगदान देत ४ षटक गोलंदाजी केली आणि १४ धावा देत २ गडी बाद केले.

तर या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात अफगानिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने सर्वाधिक ७४ तर केएल राहुलने ६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर २ बाद २१० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाकडून करीम जनतने नाबाद ४२ तर मोहम्मद नबीने ३५ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

एका विजयाने बदलली समीकरणे, जाणून घ्या टीम इंडिया कसे मिळवू शकते सेमीफायनलचे तिकीट?

‘द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याची खेळाडूंना नव्हती कल्पना’, रोहितचा खुलासा

फलंदाज म्हणून हिट; तर प्रशिक्षक म्हणून सुपरहिट, राहुल द्रविडच्या शिष्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---