राजस्थान रॉयल्ससाठी चालू आयपीएल हंगामात ट्रेंट बोल्ट याने अप्रतिम प्रदर्शन केले आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ आमने सामने होते. राजस्थानसाठी बोल्टने या सामन्यात देखील जबरदस्त गोलंदाजी केली आणि एका खास यादीत आपले स्थान उंचावले.
नेहमीप्रमाणे ट्रेंट बोल्ड (Trent Boult) लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध राजस्थान रॉयल्ससाठी डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आला. लखनऊचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) नेहमीप्रमाणे डावाच्या सुरुवातील स्ट्राईकवर होता. केएल राहुल भारतीय संघाचा अनुभवी आणि नियमित सलामीवीर आहे, मात्र बोल्टसमोर पहिल्या चषटकात राहुल एकही धाव घेऊ शकला नाही. याचसोबत राहुल आयपीएल इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) याच्या नावावर आहे. प्रवीण कुमारने आयपीएलमध्ये एकूण 14 निर्धाव षटके टाकली आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर 12 निर्धाव षटके टाकणारा भुवनेश्वर कुमार आहे. बुधवारी (19 एप्रिल) लखनऊविरुद्ध एक पहिलेच षटक निर्धाव टाकणारा ट्रेंट बोल्ड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बोल्टच्या नावावर आयपीएलमध्ये आता एकूण 11 निर्धाव षटकांची नोंद झाली आहे. त्याने भारताचा माजी दिग्गज इरफान पठाण याचा विक्रम मोडीत काढला आहे. इरफान आणि बोल्ट प्रत्येकी 10 निर्धाव षटकांसह पूर्वी या यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जसप्रीत बुमराह 8 निर्धाव षटकांसह यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. (Record break! Boult broke Irfan Pathan’s record in the first over against Lucknow)
आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज
14 – प्रवीण कुमार
12 – भुवनेश्वर कुमार
11 – ट्रेंट बोल्ट
10 – इरफान पठाण
8 – जसप्रीत बुमराह
आयपीएलमध्ये डावातील पिहेल षटक सर्वाधिक वेळा निर्धाव टाकणारे गोलंदाज
भुवनेश्वर कुमार – 8
ट्रेंट बोल्ट – 8
प्रवीण कुमार – 7
इरफान पठाण – 5
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोल्ट बनतोय बॉस! पुन्हा टाकली पहिलीच ओव्हर मेडन, चालू हंगामात घालतोय धुमाकूळ
ICC Ranking । सूर्यकुमारची ‘बादशाहत’ कायम, बाबर आझमसह पाकिस्तानी खेळाडू फायद्यात