२००५ साली टी२० या क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाऊ लागले. त्यापुर्वीच अनेक लीग स्पर्धांत ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा होतं होत्या. या स्पर्धांना व्यावसायिक रुप हे नॅटवेस्ट टी२० ब्लास्टने दिले. आज जगभरात विविध देशांच्या खाजगी व्यावसायिक ट्वेंटी-ट्वेंटी लीग्स आहेत.
परंतु आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये म्हणावे तशे सामने आजही होत नाही. पाकिस्तान संघ गेल्या १४ वर्षांत सर्वाधिक १५१ टी२० सामने खेळला आहे तर या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर असून १३४ सामने खेळला आहे.
यामुळे शोएब मलिक, रोहित शर्मा व राॅस टेलर असे ३ खेळाडूचं आजपर्यंत १०० सामने खेळू शकले आहेत. तसेच हा क्रिकेटरचा प्रकार साडे तीन तासांत संपतो. त्यामुळे संघातील ११पैकी कोणताही खेळाडू त्या सामन्यात सर्वांना भारी ठरु शकतो. त्यामुळे ठराविक खेळाडूंनाच सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळत नाही.
सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सामनावीर पुरस्कार मिळवलेले खेळाडू
१२- मोहम्मद नाबी, सामने- ७८
१२- विराट कोहली, सामने- ८२
११- शाहिद आफ्रिदी, सामने- ९९
१०- रोहित शर्मा, सामने- १०८
ट्रेंडिंग घडामोडी-
–टाॅप ५- क्रिकेटमध्ये ट्वेंटी२० कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, एकही भारतीयाचे नाव नाही यात






