वनडे क्रिकेट सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत २६११ खेळाडू खेळले आहेत. यातील अनेक क्रिकेटपटूंनी अनेक अविश्वसनीय विक्रम केले आहेत. पण अजूनही असे काही विक्रम आहेत जे कोणालाही करता आलेले नाहीत. अशा आत्तापर्यंत वनडेत न झालेल्या विक्रमांचा घेतलेला आढावा –
१. आठव्या आणि त्याखालील क्रमांकाच्या खेळाडूचे शतक –
वनडे क्रिकेटमध्ये १ ते ७ क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूंनी शतके केली आहे. मात्र आत्तापर्यंत एकदाही ८ व्या क्रमांकाच्या किंव्या त्याखालील क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूने वनडेत शतक केलेले नाही. २०१६ मध्ये इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने नॉटिंगघममध्ये श्रीलंकेविरुद्ध ८ व्या क्रमांकावर खेळताना नाबाद ९५ धावा कल्या होत्या. ८ व्या किंवा त्या खालील क्रमांकावर खेळताना केलेल्या या सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.
२. शतकांचे अर्धशतक –
वनडेमध्ये आत्तापर्यंत कोणालाही ५० शतके करता आलेली नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडेत सर्वाधिक ४९ शतके केली आहेत. तसेच त्याच्या पाठोपाठ सर्वाधिक वनडे शतके करण्यामध्ये विराट कोहली आहे. विराटने ४३ शतके केली आहेत. त्यामुळे त्याला हा विक्रम करण्याची संधी आहे.
३. अर्धशतकांचे शतक –
वनडेमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ९६ अर्धशतके केली आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत वनडेमध्ये १०० अर्धशतके कोणालाही करता आलेली नाहीत.
४. ५५० विकेट्स –
वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत खेळलेल्या गोलंदाजांपैकी एकालाही ५५० विकेट्स घेण्याचा पराक्रम करता आलेला नाही. विशेष म्हणजे वनडेत ५०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्सही केवळ मुथय्या मुरलीधरन आणि वासिम आक्रम या दोन गोलंदाजांनाच घेता आल्या आहेत. मुरलीधरनने ५३४ विकेट्स तर आक्रमने ५०२ विकेट्स आहेत.
५. १५ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स –
एका सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स एका फलंदाजाने शतक करण्यासारखी मोठी कामगिरी मानली जाते. परंतू आत्तापर्यंत कोणत्याच गोलंदाजाला वनडेत १५ वेळा एका सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेता आलेल्या नाहीत. वनडेत वकार युनुसने सर्वाधिक १३ वेळा वनडेत ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
६. २५० झेल –
क्षेत्ररक्षण (यष्टीरक्षक व्यतिरिक्त) करताना आत्तापर्यंत कोणत्याही खेळाडूला वनडेमध्ये २५० किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेता आलेले नाही. आत्तापर्यंत वनडेत यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल श्रीलंकेचा क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेने घेतले आहेत. त्याने ४४८ सामन्यात खेळताना २१८ झेल घेतले आहेत.
७. यष्टीमागे ५०० विकेट्स –
वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत कोणत्याही यष्टीरक्षकाला यष्टीमागील झेल किंवा यष्टीचीत मिळून ५०० विकेट्स घेता आलेल्या नाहीत. वनडेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्सचा विक्रम सध्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने यष्टीमागे ४८२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ ऍडम गिलख्रिस्ट(४७२) आणि एमएस धोनी(४४४) आहेत.
८. ४ वेगवेगळ्या दशकात वनडे शतक –
पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक जेव्हा लाहोरमध्ये टी२० सामना खेळला तेव्हा तो आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ वेगवेगळ्या दशतकात सामने खेळणारा ८ वा खेळाडू ठरला. तसेच आत्तापर्यंत केवळ मलिक, सचिन तेंडुलकर, सनथ जयसुर्या यांनीच ४ वेगवेगळ्या दशतकात वनडे सामने खेळले आहेत. त्यातील केवळ सचिनला ३ वेगवेगळ्या दशतकात शतक करण्यात यश आले आहे. त्यामुळे ४ वेगवेगळ्या दशतकात वनडेत शतक करण्याचा विक्रम अजूनतरी कोणालाही करता आलेला नाही.
ट्रेडिंग घडामोडी –
लोकांची रस्त्यावर उतरुन मदत करणाऱ्या जोगिंदर शर्माचे या संस्थेकडून जोरदार कौतूक
संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत केलेले ५ क्रिकेटर्स
ज्या बीसीसीआयला लोकांनी ट्रोल केले, त्यांनी एका झटक्यात दिले एवढे कोटी
रैना सर्वात मोठा दिलदार, सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान