---Advertisement---

‘कोहलीने प्रार्थना करावी की मुंबईकर फॉर्ममध्ये नसावेत,’ अवघे १८ सामने खेळणाऱ्या दिग्गजाचे मोठे भाष्य

On: शुक्रवार, एप्रिल 2, 2021 3:28 PM
---Advertisement---

आयपीएल सुरू होण्याची प्रतीक्षा अखेर संपत आली आहे. आयपीएल स्पर्धा काही दिवसांवर आहे. ९ एप्रिल रोजी, ५ वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स समोर पहिले वहिले जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ असणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्हीही संघ कसून सराव करत आहेत. अशातच भारतीय संघासाठी अवघे १८ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या माजी भारतीय क्रिकेटपटूने विराट कोहलीच्या आरसीबी संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

हा सामना अतिशय रंगतदार होणार यात काही शंका नाही. एकीकडे बेंगलोर संघाकडून विराट कोहली, एबी डीवीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यांसारखे आक्रमक फलंदाज आहेत. तर दुसरीकडे मुंबई संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या आणि पोलार्ड सारखे स्टार फलंदाज आहेत.

या मोठ्या सामन्यापूर्वी माजी भारतीय खेळाडू रितेंदर सिंग सोडी यांनी म्हटले आहे की, “विराट कोहलीला पहिला सामना जिंकण्यासाठी प्रार्थना करावी लागेल की, मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू फॉर्ममध्ये असायला नकोत.”

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय संघातील खेळाडू सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, इशान किशन आणि रोहित शर्मा चांगल्याच फॉर्ममध्ये होते. हे खेळाडू आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. त्यामुळे मुंबई इंडियन्स एक मजबूत संघ म्हणून मैदानात उतरणार आहे.

या सामन्याबाबत बोलताना रितेंदर सिंग सोडी म्हणाले, “जेव्हा मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू भारतीय संघासाठी खेळत होते. तेव्हा विराट कोहली विचार करत असेल की, त्यांनी प्रत्येक झेल टिपला पाहिजे. तसेच चांगले प्रदर्शन केले पाहिजे. परंतु तो त्यांच्या विरोधात खेळत आहे. तर तो प्रार्थना करत असेल की यांनी सर्व झेल सोडावे आणि लवकर बाद व्हावे.”

महत्त्वाच्या बातम्या-

कोण घेणार आयपीएलमधून माघार घेतलेल्या हेजलवुडची जागा? सीएसकेच्या अधिकाऱ्याने दिले उत्तर  

लोकलने प्रवास करणारा शार्दुल आता फिरवणार महागडी कार, आनंद महिंद्रांचे भारदस्त गिफ्ट मिळालं

विजयासाठी आसुसलेल्या आरसीबीचे ‘हे’ नवोदित धुरंधर मारणार मैदान; प्रशिक्षकाने केला दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---