क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींचे प्रेमप्रकरण ही चाहत्यांसाठी मोठी गोष्ट नाही. असे अनेक क्रिकेटपटू आणि अभिनेत्री आहेत ज्यांचे प्रेमसंबंध लग्नापर्यंतही पोचले आहेत. मात्र नुकतीच क्रिकेट आणि बॉलिवूडशी संबंधित एक छुपी लव्ह स्टोरी समोर आली आहे. यामध्ये असे म्हटले जात आहे की, पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री रेखा हे प्रेमात होते. एका इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केलेल्या जुन्या वृत्तपत्राच्या कात्रणावरून ही माहिती समोर आली आहे. ही पोस्ट ऑक्टोबर २०२० मधील असून पुन्हा चर्चेत आली आहे. पोस्टमध्ये असलेले कात्रण स्टार वृत्तपत्रातील असून ते १९८५ सालातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
आईने दाखवलेली कुंडली
या कारणाचा संदर्भ पाहता बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान लग्न करणार असल्याच्या चर्चा पूर्वी होत्या. बातमीत भारतीय फिल्म जर्नल मुव्हीचा हवाला देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, रेखाची आई या नात्यामूळे आनंदी होती आणि तिने रेखाची कुंडली ज्योतिषालाही दाखवली होती. इम्रान खानने रेखासमवेत मुंबईत काही काळ घालवला, असेही लिहिले आहे. एप्रिल महिन्यात दोघेही एकत्र होते. हे दोघेही मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि नाईटक्लबमध्ये एकत्र फिरताना दिसले. या बातमीत काही लोकांच्या हवाल्याने असे लिहिले होते की, इम्रान आणि रेखा खूप जवळ आले होते. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते.
अभिनेत्रीशी नव्हते करायचे लग्न
इम्रान खानचे विधानही या बातमी छापले गेले आहे. यामध्ये इम्रान म्हणाला होता, ‘मी थोड्या काळासाठी अभिनेत्रींसोबत राहू शकतो. मला त्यांच्याबरोबर काही काळ राहणे आवडेल. यापुढे जाऊन मी चित्रपटात काम करण्याऱ्या अभिनेत्रीशी लग्न करू शकत नाही.’ बातमीत असे लिहिले आहे की, झीनत अमान आणि शबाना आझमीसोबतही इम्रानचे संबंध होते.
https://www.instagram.com/p/CGmZwmRnAr3/?igshid=gusv7e6u42a2
इम्रान यांची झाली तीन लग्ने
इम्रान खान यांनी १९९५ मध्ये ब्रिटिश निर्माता जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केले. मात्र, २००४ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये ब्रिटिश पत्रकार रेहम खानशी लग्न केले परंतु हे संबंध केवळ एक वर्ष टिकले आणि दोघांचा घटस्फोट झाला. इम्रान २०१८ मध्ये तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले केले. त्यांच्या सध्याच्या पत्नीचे नाव बुशरा बीबी आहे. १९९२ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तान सोडले होते. त्यांच्या पक्षाने २०१७ मध्ये निवडणूक जिंकली आणि ते देशाचे पंतप्रधान बनले.
त्याच वेळी रेखा यांनी १९९० मध्ये दिल्लीचे उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. मात्र, त्यांच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतरच मुकेश यांनी आत्महत्या केली. यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
लढाई कोरोनाविरुद्धची! ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनी टोचून घेतली कोरोनाची लस, पाहा संपूर्ण यादी
आयपीएल २०२१ ची ‘फ्लॉप इलेव्हन’ पाहून घ्या, भल्याभल्या टी२० स्टार्सचा आहे समावेश
“मला चेन्नईतही संधी दिली नाही, मी खरचं इतका वाईट आहे का?” भारतीय गोलंदाज हळहळला






