ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वाॅर्न (Shane Warne) याचा शुक्रवारी (४ मार्च) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर जगभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. त्याच्या जाण्यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅंटिंगने (Ricky Ponting) शोक व्यक्त केला आहे. वाॅर्नला श्रद्धांजली वाहत असताना रिकी पॅांटिंगला अश्रू अनावर झाले होते. ही बातमी ऐकून तो निराश झाला होता. त्याला अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. रिकी पाॅंटिंग आणि शेन वाॅर्नने एकत्र अनेक सामने खेळले होते.
रिकी पाँटिंगच्या मते, तो ही बातमी ऐकून तो सून्न झाला आहे. त्याला यावर अजिबात विश्वास बसला नाही. पाँटिंग म्हणाला की, “सर्व लोकांसारखाच मी सुद्धा खूप हैराण झालो आहे. मी सकाळी उठलो आणि मला संदेश आला होता. मला माझ्या मुलीला नेटबाॅलसाठी घेऊन जायचे होते. यानंतर मी ही बीतमी ऐकली. मला अजिबात विश्वास बसला नाही. माझा या गोष्टीवर विश्वास बसण्यासाठी खूप तास लागले. तो माझ्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. एवढ्या वर्षांमध्ये आमच्या अनेक आठवणी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक युवा क्रिकेटरला त्याच्या सारखेच फिरकी गोलंदाज बनायचे होते. मी त्याच्यासारखा गोलंदाज पाहिला नाही. त्याने फिरकी गोलंदाजीत नव्या पद्धतीने क्रांती आणली होती.”
https://www.youtube.com/watch?v=Q96XCvpic8E
रिकी पाँटिंग म्हणाला की, “मी पहिल्यांदा जेव्हा शेन वाॅर्नला भेटलो, तेव्हा तो अकादमीत १५ वर्षांचा होता. आम्ही एक दशकाहून अधिक काळ एकमेकांसोबत काम केले आहे. त्या काळात आम्ही अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे.”
Hard to put this into words. I first met him when I was 15 at the Academy. He gave me my nickname.
We were teammates for more than a decade, riding all the highs and lows together.
Through it all he was someone you could always count on, someone who loved his family… pic.twitter.com/KIvo7s9Ogp
— Ricky Ponting AO (@RickyPonting) March 5, 2022
ऑस्ट्रेलियाच्या शेन वाॅर्नने १५ वर्षाच्या कारकिर्दीत ऐकून १४५ कसोटी सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने ७०८ विकेट घेतल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील त्याने २९३ विकेट घेतल्या आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये तो खेळला आहे आणि यशस्वी सुद्धा झाला आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली शेन वाॅर्नने चांगल्या खेळी खेळल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित सुपर-डुपर हिट, एका डावाने मॅच जिंकत केला मोठा रेकॉर्ड
एकावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?
आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी टीम इंडियाला मिळाला होता हिरा, ज्याने बदलला क्रिकेटचा चेहरामोहरा