यावर्षीचा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात आहे. पण यजमान ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाहीये. ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. यात एक चर्चा म्हणजे संघाला नवीन टी-20 कर्णधार मिळण्याची. ऍरॉन फिंच मागच्या काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. अशात आता टी-20 फॉरमॅटमधून देकील फिंच लवकर निवृत्ती घेईल असा अंदाज बांधला जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंगने देखील संघाच्या नवीन टी-20 कर्णधाराचे नाव सुचवले आहे.
टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघात काही महत्वाचे बदल दिसण्याची शक्यता आहे. संघात होणारा प्रमुख बदल म्हणजे नवीन कर्णधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ऍरॉन फिंच (Aaron Finch) हॅमस्टिंगच्या दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातील त्यांचा शेवटचा सामना खेळू शकला नाही. फिंचने काही दिवासंपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण टी-20 प्रकारातून निवृत्तीविषयी त्याने अजून काही ठरवले नाहीये. फिंचने जर निवृत्ती घेतली, तर त्याच्या जागी ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) संघाचा नवीन कर्णधार बनू शकतो, असे स्वतः रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) म्हणाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज पॉंटिंग माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याला विचारले केले की फिंचनंतर ऑस्ट्रेलियन टी-20 संघाचा कर्णधार कोण असेल? या प्रश्नावर उत्तर देताना त्याे ग्लेन मॅक्सवेल हे नाव घेतले. पॉंटिंगच्या मते मॅक्सवेल आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि बीबीएलमध्ये मलेबर्न स्टार्स संघाचा कर्णधार राहिला आहे. अशात ऑस्ट्रेलियन टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी त्याच्यापेक्षा उत्तम पर्याय सध्या संघात नाहीये. “त्याने आयपीएल आणि बीबीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, हे स्पष्ट दिसते. मला वाटते तोच संघाचा कर्णधार बनेल.”
फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पॅट कमिन्स (Pat Cummins) ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनला. कमिन्सकडे या संघाचे नेतृत्व दिल्यामुळे पॉंटिंगला मात्र आश्चर्य वाटले. तो पुढे बोलताना म्हणाला की, “मी पॅट कमिन्सला टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद घेताना पाहू शकत नाही. त्याला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो होतो. कारण तो वर्कलोड मॅनेज करण्यासाठी नेहमीच एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती घेत असतो. याच कारणास्तव आपण मॅक्सवेलकडे पाहू शकतो. मला वाटते सध्या मॅक्सवेल संघाकडे असलेला सर्वोत्तम पर्याय आहे.”
दरम्यान, ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकातून बाहेर निघला आहे. आता ऑस्ट्रेलियन संघ पुढचे अनेक महिने एकही टी-20 सामना खेळणार नाहीये. संघाला पुढचा टी-20 सामना 2023 च्या ऑगस्ट महिन्यात खेळायचा आहे. दरम्यानच्या काळात फिंचला पूर्णपणे विश्रांती मिळणार असून निवृत्ताचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! रे*प केसचा आरोपी धनुष्का गुणतिलकाची श्रीलंका संघातून हकालपट्टी, जामीनही नाही मिळाला
शोएब अख्तरने घेतली दक्षिण आफ्रिका संघाची फिरकी; म्हणाला, तुम्ही सर्वात मोठे ‘सी’ आहात