---Advertisement---

शाकिब अल हसनचे मोठे विधान, उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतरही संघावर खुश

On: सोमवार, नोव्हेंबर 7, 2022 1:01 PM
Shakib Al Hasan
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकाची सुपर 12 फेरी रविवारी (6 नोव्हेंबर) संपली. बांगलादेशने सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तानसोबत खेळला आणि त्यांचा स्पर्धेतील प्रवास देखील या सामन्यानंतर संपला. पाकिस्तानविरुद्धचा सामना जर बांगलादेशने जिंकला असता, तर त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला असता. मात्र त्यांचा कर्णधार शाकिब अल हसन मात्र संघाच्या प्रदर्शनावर समाधानी दिसत आहे. शाकिबच्या मते बांगलादेशने टी-20 विश्वचषकात आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. 

बांगलादेश संघाने यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात एकूण 5 सामने खेळले. यापैकी 2 सामने त्यांनी जिंकले असून 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यांचा संघ सुपर 12 मध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला. बांगलादेशने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारला. या पराभवानंतर त्यांचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याचे एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. शाकिबच्या मते या विश्वचषकत स्पर्धेत बांगलादेशने आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे.

पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शाकिब अल हसन म्हणाला की, “निकाल पाहत हा टी-20 विश्वचषक आमचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन राहिले आहे. पण आम्ही अजून चांगले प्रदर्शन करू शकत होतो. संघात नवीन खेळाडू आहेत आम्ही बदलांमधून जात आहोत. अशात हे आमचे सर्वात चांगले प्रदर्शन आहे. आम्हाला अशाच प्रदर्शनाची आपेक्षा करू शकत होतो. मी अजून चांगले खेळू शकत होतो. जोपर्यंत मी फिट आहे आणि चांगले प्रदर्शन करत आहे, तोपर्यंत संघासाठी खेळायला मला आवडेल.”

दरम्यान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित 20 षटकांमध्ये बांगलादेश संघ 8 विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या 127 धावांपर्यंत पोहोचू शकला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 18.1 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 128  धावांचे लक्ष्य गाठले. आता उपांत्य फेरीत बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला गेला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने मोडला बाबर आझमचा विक्रम, बनला ‘असे’ करणारा पहिला कर्णधार
एकेवेळी पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानचा कर्णधार म्हणतोय, ‘आता आम्हाला चढलाय जोश’ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---