भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा चौथा कसोटी सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाने ब्रिस्बेन येथील कोरोना नियमांसंदर्भात नाराजी व्यक्त केलेली होती. या सर्व चर्चेमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू रिकी पॉंटिंगची प्रतिक्रिया समोर येत आहे. पॉंटिंगने भारतीय संघाला बहानेबाज मानले आहे. पॉंटिंगच्या मते भारतीय संघ कदाचित ब्रिस्बेन येथे खेळण्याच्या मानसिकतेत नाही.
तिसऱ्या कसोटी सामन्यात समालोचन करत असताना पाँटिंग म्हणाला, “असे वाटत आहे की भारतीय संघ ब्रिसबन येथे न जाण्यासाठीची कारणे शोधत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय संघ ब्रिस्बेनच्या क्वारंटीन नियमांसंदर्भात चिंतेत होता व ते आता कोरोनाला घाबरत आहेत.”
रिकी पॉंटिंग म्हणाला, “बायोबबल संदर्भात बोलणे हे माझ्यासाठी विचित्रच आहे, कारण भारतीय खेळाडूंपेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडू जास्त वेळ बायोबलमध्ये राहिलेले आहेत. ब्रिसबन येथे ऑस्ट्रेलियन खेळाडू देखील भारतीय खेळाडूंप्रमाणेच बायो बबल मध्ये राहणार आहेत.आम्ही आयपीएल दरम्यान कोणत्याच भारतीय खेळाडूंकडून ऐकले नाही की त्यांना क्वारंटाईन व बायो बबल मध्ये काही चिंता आहे.”
पॉंटिंग भारतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुढे म्हणाला, “हो, भारतीय संघ आपल्या घरापासून दूर आहे, मात्र हे सर्वांना माहीतच होते. तुम्ही दौऱ्यावर कसोटी सामने खेळण्यासंदर्भात होकार दिला. हे सर्व प्रकरण कोणासाठीच उत्तम नाही मग ते ऑस्ट्रेलियन संघ असो अथवा भारतीय संघ. जर ते ब्रिस्बेनला जाणार असतील तर त्यांना हॉटेलमध्ये बंद रहावेच लागेल.”
महत्वाच्या बातम्या:
आजच्या खेळीने पंतच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच आशियाई यष्टीरक्षक
शाबास गड्यांनो…! अश्विन आणि विहारी यांच्या जोडीने रचलाय ‘हा’ कमाल विक्रम
सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ