---Advertisement---

दिल्लीचा कर्णधार पंतने गमावली चालून आलेली संधी, तरीही पाँटिंगने केला बचाव; म्हणे, ‘तो अजून युवा..’

On: रविवार, मे 22, 2022 3:18 PM
Ricky-Ponting-Rishabh-Pant
---Advertisement---

रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला प्लेऑफच्या नजीक पोहोचून अपयशाचे तोंड पाहावे लागले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा आयपीएल २०२२मधील आपला शेवटचा साखळी फेरी सामना जिंकत दिल्लीकडे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी होती. परंतु दिल्लीने ५ विकेट्स राखून हा सामना गमावला. यानंतर दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पंतच्या नेतृत्त्वपदाचा बचाव केला आहे.

आपण पंतला (Rishabh Pant) दिल्लीच्या (Delhi Capitals) नेतृत्त्वपदी कायम ठेवण्यासाठी समर्थन करत आहोत. तो युवा यष्टीरक्षक फलंदाज असून आता नेतृत्त्वाचे धडे घेतोय. ज्यामुळे तो या पदासाठी योग्य पर्याय बनून राहिल. 

पंतविषयी काय म्हणाले प्रशिक्षक पाँटिंग 
पंतच्या कर्णधारपदाबद्दल पाँटिंग (Ricky Ponting On Rishabh Pant Captaincy) म्हणाले की, “निश्चितपणे माझ्या डोक्यात कोणताही संशय नाही की, पंत दिल्ली संघाच्या नेतृत्त्वासाठी योग्य निवड असेल. मागच्या हंगामातही त्याच्याकडे नेतृत्त्वपद सोपवण्याबाबत कसलीही शंका नव्हती. रिषभने श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाचे कर्णधारपद सांभाळत संघासोबत शानदार काम केले आहे. पंत मुंबईविरुद्धचा सामना गमावल्यानंतर खूप निराश झाला होता. परंतु त्याला पराभवासाठी जबाबदार मानले जाऊ शकत नाही.”

वरच्या फळीने बिघडवला खेळ
“पंत अजून युवा आहे. तो नेतृत्त्वातील बारीक सारीक गोष्टी शिकत आहे. टी२० संघाचा कर्णधार बनणे सोपे काम नसते, विशेष करून आयपीएलमध्ये. कारण आयपीएल ही दबावाने भरलेली स्पर्धा आहे आणि यामध्ये तुम्ही जे काही करता त्या प्रत्येक गोष्टीला फार बारकाईने पाहिले जाते. पंतला माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असे पाँटिंग पुढे म्हणाले.

दिल्ली कॅपिटल्सचे असे राहिले प्रदर्शन
दरम्यान दिल्ली संघाच्या आयपीएल २०२२मधील प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, दिल्लीने साखळी फेरीतील १४ सामने खेळताना ७ सामने जिंकले आहेत आणि ७ सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच त्यांनी हंगामातील त्यांचा पहिला सामना खेळला होता आणि ४ विकेट्स राखून हा सामनाही जिंकला होता. परंतु पुढे दिल्ली संघाच्या प्रदर्शनात चढ-उतार पाहायला मिळाले. ज्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये पात्रता मिळवण्यासाठी अखेरच्या साखळी फेरी सामन्यावर निर्भर राहावे लागले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘आम्ही लयीत यायला उशीर केला, पण…’, रोहितची मुंबईच्या कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी लवकरच होणार टीमची घोषणा? ‘या’ नव्या खेळाडूंना मिळू शकते संधी

मस्ती आणि खूप सारा केक..! तेवतियाने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसंगे साजरा केला बर्थडे, पत्नीचीही हजेरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---