---Advertisement---

चेन्नई संघात ‘या’ खेळाडूचे पुनरागमन होत असल्याचे पाहून दिल्लीचा प्रशिक्षक पाँटिंग आला टेंशनमध्ये, म्हणाला…

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 6:21 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले होते. तसेच आज (१० एप्रिल) होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने-सामने असणार आहेत. या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही ही संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. या मोठ्या सामन्यापूर्वी सुरेश रैनाबद्दल दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षकाने मोठे वक्तव्य केले आहे.

गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. सुरेश रैनाने या हंगामातून वैयक्तिक कारणास्तव माघारी घेतली होती, याचा जोरदार फटका चेन्नई संघाला बसला होता. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेत तो पुनरागमन करतोय. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अशातच दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी या मोठ्या सामन्यापूर्वी सुरेश रैनाबद्दल वक्तव्य केले आहे. पाँटिंगने म्हटले की, “चेन्नई सुपर किंग्ज संघ हा आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघ आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट कर्णधार आणि उत्कृष्ट संघ देखील आहे. सीेएसके संघाने आतापर्यंत उल्लेखनीय क्रिकेट खेळले आहे. गतवर्षी त्यांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. माझ्या मते सुरेश रैनाच्या अनुपस्थितीमुळे चेन्नई संघाने निराशाजनक कामगिरी केली असावी. परंतु यंदा तो पुनरागमन करत आहे. गेल्या हंगामात सीेएसके संघाला रैनाची कमतरता जाणवली होती.”

तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी करत आयपीएल २०२० स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण यंदा,श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत युवा रिषभ पंतला दिल्ली संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘बहुत मजा आयेगा आज!’ धोनी-पंतला आमने-सामने पाहण्यास टीम इंडियाचे गुरु सज्ज

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---