Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुन्या कामगिरीमुळे विराट पुन्हा वाचला, कसोटीतील फ्लॉप ठरूनही माजी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास

जुन्या कामगिरीमुळे विराट पुन्हा वाचला, कसोटीतील फ्लॉप ठरूनही माजी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास

March 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या धावा करण्यासाठी झगडताना दिसत आहे. विराटची बॅट सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत शांत दिसली. याच पार्श्वभूमीवर त्याच्याव पुन्हा टिका देखील सुरू झाल्या आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगच्या मते विराट एक चॅम्पियन खेळाडू आहे आणि तो नक्कीच पुनरागमन करेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या या कसोटी मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) अद्याप चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये. पण रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्या मते या एका कसोटी मालिकेतील प्रदर्शनामुळे आपण विराटविषयी मत तयार करू शकत नाही. मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. विराटने या सामन्याच्या पहिल्या डावात 22, तर दुसऱ्या डावात 13 धावा केल्या. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्येही त्याची बॅट शांतच आहे. याच पार्श्वभूमीवर विराटवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

आयसीसी रिव्यू कार्यक्रमात बोलताना रिकी पाँटिंगने फलंदाजांच्या खराब प्रदर्शनावर काहीच बोलणार नाही, असे स्पष्टच सांगितले. पाँटिंग म्हणाला, “मी या मालिकेत कोणत्याच फलंदाजाच्या खराब फॉर्मवर बोलणार नाही. कारण फलंदाजांसाठी हे एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. आपल्या सर्वांनाच माहितीये की या मालिकेत फलंदाजी खूपच अवघड राहिली आहे. फक्त चेंडू टर्न होत असल्यामुळे अडचण येते असे नाहीये. चेंडूचा बाउंस देखील अनियमित आहे.”

विराट पुनरागमन करेलच – रिकी पाँटिंग
“विराटविषयी बोलायचे तर मी आधीही म्हटलो आहे, चॅम्पियन खेळाडू पुनरागमन करण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधतातच. त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या धावा तो करत नसला, तरीही ही परिस्थिती त्यालाही माहिती आहे. जेव्हा तुम्हा एक फलंदाज असता आणि तुम्हाला धावा करण्यासाठी झगडावे लागत असेल, तर तुम्हाला या गोष्टीची कल्पना असते. मला विराटची चिंता नाहीये, कारण त्याच्यावर विश्वास आहे की, तो पुनरागमन करेलच,” असे पाँटिंग पुढे म्हणाला.
(Ricky Ponting supports Virat Kohli who is flopp in Tests)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोनाल्डोच्या दातृत्वाचा आणखी एक‌ दाखला! तुर्कीतील भूकंपग्रस्तांची जबाबदारी घेतली खांद्यावर, केली तब्बल इतकी मदत
अहमदाबाद कसोटीत पंतप्रधान मोदी करणार कॉमेंट्री? ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही आजमावलाय हात


Next Post
fOOTBALL

आमदार चषक फुटबॉल । केपी इलेव्हन, इंद्रायणी एससी उपांत्यपूर्व फेरीत

Mumbai-City-FC

मुंबई सिटी एफसी 'डबल' धडाक्याच्या तयारीत! सेमी फायनल लेग 1 मध्ये बंगळुरू एफसीला भिडणार

File Photo

चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत कॉर्नर पॉकेट टायगर्स, पीवायसी जायंट्स, बीपीसीएल एनरजायजर्स संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143