जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या नावाचाही समावेश होतो. ऑस्ट्रेलिया संघाचा यशस्वी कर्णधार राहिलेल्या पाँटिंग याने सचिनविषयी मोठे भाष्ये केले आहे. फक्त सचिनच नाही, तर विराट कोहली याच्याविषयीही पाँटिंगने मत मांडले आहे. चला तर या आपण जाणून घेऊयात सचिन आणि विराटबद्दल पाँटिंग नेमका काय म्हणालाय…
रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे. तसेच, त्याचे कौतुक करत पाँटिंग म्हणाला की, गोलंदाजांकडून मिळणाऱ्या प्रत्येक आव्हानाचे त्याच्याकडे उत्तर असायचे. याव्यतिरिक्त विराटबद्दल बोलताना तो म्हणाला की, “विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्यानंतरच सचिन तेंडुलकरसोबत त्याची तुलना करणे योग्य ठरेल.”
‘त्याच्याकडे प्रत्येक उत्तर’
तो म्हणाला की, “मी आधीही म्हणालो आहे की, तांत्रिकदृष्ट्या सचिन सर्वोत्तम फलंदाज आहे, ज्याला मी पाहिले आहे की, ज्याच्यासोबत किंवा ज्याच्याविरुद्ध खेळलो. गोलंदाजी विभागात आम्ही जी रणनीती बनवायचो, त्याचे उत्तर त्याच्याकडे असायचे. मग तो भारतात असो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये.”
सचिन तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये (ICC Review) बोलताना म्हटले की, “खेळाडूंची रँकिंग करणे किंवा त्यांचे आकलन करणे कठीण असते. कारण, प्रत्येकजण वेगळ्याप्रकारे खेळतो. मात्र, मी ज्या काळात खेळलो, त्यात सचिन तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम होता.”
सचिन आणि विराट (Sachin And Virat) यांच्यातील तुलनेविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “सचिनच्या कारकीर्दीच्या अखेरच्या काळात विराटने खेळण्यास सुरुवात केली. मात्र, आता खेळ वेगळा आहे. वेगवेगळ्या नियम आहेत. वनडे क्रिकेटमध्ये यार्डाच्या बाहेर कमी खेळाडू असतात, दोन नवीन चेंडू वापरले जातात आणि आता फलंदाजी पूर्वीपेक्षा सोपी झाली आहे.”
तो म्हणाला की, सचिनच्या काळात जुना चेंडू खेळणे खूपच कठीण असायचे. कारण, त्याला रिव्हर्स स्विंग मिळायचा. तो म्हणाला की, “जेव्हा सचिन वनडे खेळायचा, तेव्हा 50 षटकांनंतर चेंडूचा आकार बदलायचा. त्याला रिव्हर्स स्विंग मिळायची, जी आज पाहायला मिळत नाही.”
विराटविषयी बोलताना पाँटिंग म्हणाला की, “विराट खूपच प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या नावावर 70पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सचिनने 100 शतके केली आहेत. विराटची कारकीर्द संपल्यानंतर दोघांची तुलना करणे योग्य ठरेल. मी खेळाडूंच्या क्षमतेचे आकलन तो किती वर्षे खेळू शकला, यावर करतो. ही योग्य पद्धत यासाठी आहे. कारण, इतके वर्षे सातत्याने खेळणे सोपे नाही. काही खेळाडू येतात आणि तीन-चार वर्षात जगातील सर्वोत्तम खेळाडू बनतात. मात्र, दीर्घ काळ टिकणे कठीण असते आणि सचिन वीस वर्षांपेक्षा जास्त चांगला खेळला आहे.”
अशाप्रकारे पाँटिंगने विराट आणि सचिन यांच्यातील तुलनेविषयी स्पष्ट मत मांडले. आता चाहते विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची तुलना करणे बंद करतात की, सुरूच ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ricky ponting talked about sachin tendulkar read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची विकेट काढताच बोल्टचा नाद पराक्रम! IPLमध्ये आतापर्यंत ‘एवढ्या’ फलंदाजांना शून्यावर धाडलंय तंबूत
विराटच्या फक्त तोंडातच दम! भांडणाविषयी बोलताना म्हणाला, ‘कुणी मला मारून निघून जाईल, पण मी…’