इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी ऍशेस कसोटी मॅनचेस्टरमध्ये खेळली जात आहे. ऑस्ट्रेलिया सध्या 1-2 अशा आघाडीवर आहे. अशात चौथा सामना निर्णायक ठरू शकतो. पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपली बॅझबॉल रणनीती वापरून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा घाम काढला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्धणार रिकी पाँटिंग आपल्या संघाच्या गोलंदाजांचे प्रदर्शन पाहून समाधानी नाहीये. पाँटिंगने मॅनचेस्टर कसोटीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या चुकीवर बोट ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियन संघ नाणेफेक गमावल्यानंतर मॅनचेस्टर कसोटीत प्रथम फलंदाजीला आला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 90.2 षटकात 317 धावा केल्या. प्रत्युत्तरा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्ययंत इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 384 धावा होती. सलामीवीर झॅक क्राउली याने 189 धावांची वादळी खेळी करत इंग्लंडला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. या धावा क्राउलीने अवघ्या 182 चेंडूत केल्यामुळे त्याचे विशेष कौतुक केले जात आहे. तसेच मोईन अली 54, जो रुट 84, हॅरी ब्रुक 61 आणि कर्धणार जेम्स अँडरसन याने 51 धावांची महत्वपूर्ण खेळी. रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्या मते ऑस्ट्रेलियन गोलंदाज मॅनचेस्टरमध्ये अपेक्षेप्रमाणे शॉर्ट चेंडू टाकू शकले नाही आणि त्यामुळेच इंग्लिश फलंदाज धावा करू शकले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ पाहून ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग नाखूश असल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियन गोलंदाज शॉर्ट चेंडू टाकून इंग्लंडच्या झॅक क्राउली आणि जो रुट यांच्यापूढे अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची ही रणनीती कामी आली नाही. याच पार्श्वभूमीवर रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर निशाणा साधला. “शॉर्ट चेंडूची रणनीती योग्य होती. पण मला वाटते शॉर्ट चेंडू कोणत्याच पातळीवर शॉर्ट नव्हता. तसेच हा चेंडू दूर-दूरपर्यंत सरळ देखील वाटत नव्हता. क्राउली आणि रुट या चेंडूंचा सामना चांगल्या पद्धतीने करत होते.”
दरम्यान, उभय संघांतील ऍशे 2023 मालिकेचे पहिले दोन सामने पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर तिसरा सामना यजमान इंग्लंडने जिंकला होता. मालिकेतील चौथा सामना जर इंग्लंडने जिंकला, तर मालिका 2-2 अशा बरोबरीवर येईल. पण जर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बाजी मारली, तर ऍशेस 2023 ट्रॉफी इंग्लंडला जिंकता येणार नाही. (Ricky Ponting unhappy with Australia’s bowling in Manchester Test)
महत्वाच्या बातम्या –
सलामीवीर बनताच रोहितची कारकीर्द गेली टॉपवर! एकदा आकडेवारी पाहूनच घ्या
WI vs IND । ‘हे’ आहे शार्दुलला बाहेर बसवण्याचं कारण, समोर आली महत्वाची माहिती