रिंकू सिंगने आयर्लंड दौऱ्यावर भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये पदार्पण करणाऱ्या रिंकू सिंगने दुसऱ्या सामन्यात पहिला डाव खेळला आणि पहिल्याच सामन्यात रिंकूने सर्वांना वेड लावले. रिंकूने वेगवान धावा करत संघाला चांगली धावसंख्या गाठण्यात मदत केली. त्यानंतर संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने त्याचे कौतुक केले.
रिंकू सिंग (Rinku Singh) सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. रिंकूने भारतीय संघासाठी चांगली खेळी केल्यानंतर संघातील अनेक खेळाडू त्याचे कौतुक करत आहेत. दरम्यान आयर्लंडच्या दौवऱ्यावर भारतीय संघाचा सलामवीर असणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने देखिल त्याचे कौतुक केले आहे. ऋतुराज म्हणाला की, “भारतीय संघात येणारे खेळाडू रिंकू कडून शिकू शकतात. तो संघात सर्वांता लाडका आहे.”
ऋतुराज पुढे म्हणाला की, “रिंकू सर्वांचा आवडता बनला आहे, त्याने त्याच्या खेळात एखाद्या अनुभवी खेळाडू सारखा खेळ दाखवला आहे. आगामी फिनिशर त्याच्याकडून शिकू शकतात की तो आक्रमण अंदाजात येतो आणि परिस्थितीचे मूल्यांकन करतो.”
रिंकूला त्याच्या या उत्तम खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिंकूने पदार्पणाच्या डावातच सामनावीर पुरस्काराचा किताब पटकावला.
भारताने मालिकेत आघाडी घेतली
भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 2-0 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 33 धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी, पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी विजय मिळवला होता. आता तिसरा आणि अंतिम सामना बुधवार, 23 ऑगस्ट रोजी डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळवला जाईल. भारतीय संघ विजयाची हॅट्रीक करुन मालिकेवर विजय मिळवणार का? याची आतुरता सर्व क्रिकेट प्रेमींना आहे. (rinku singh become everyone’s favroite ruturaj gaikwad says)
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक 2023 पूर्वी आर्चरने बदलली आपल्या गोलंदाजीची ऍक्शन, पहा व्हिडीओ
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत एकुण 160 खेळाडू सहभागी