भारत आणि बांगलादेश या संघामध्ये चट्टोग्राम येथे कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या रिषभ पंत याने क्रिकेट कारकिर्दीत एक मोठी कामगिरी केली. याा साामन्यात रिषभ पंत याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. एमएस धोनी याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण करणारा तो दुसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे. याच सामन्यात पंतने कसोटी क्रिकेटमधील 50 षटकार देखील पूर्ण केले.
बांगलादेश विरुद्धच्या पहिलया कसोटी सामन्यात रिषभ पंत (Rishabh Pant) याने 25 धावा करताच त्याने ही मोठी कामगिरी केली. हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताचेे 3 गडी तंबूत परतले होते. त्याने चेतेश्वर पुजारा याच्यासोबत मिळून भारताचा डाव सांभाळला आणि 64 धावांची भागीदारी केली. पंतने या सामन्यात 46 धावांची खेळी केली.
पंतने आतापर्यंत भारतासाठी 32 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने जवळपास 43.38च्या सरासरीने 2169 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5 शतके तर 10 अर्धशतके आहेत. त्याच्या नावावर 30 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 865 धावा आणि 66 टी20 सामन्यांमध्ये 987 धावा केल्या होत्या.
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा आहे. तर जगात त्याचा क्रमांक दुसरा लागतो. धोनी 17266 धावा करत दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंंकेचा कुमार संगाकारा (Kumar Sangakara) याने 17840 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) 15252 धावांबरोबर तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) 11223 धावा करत चौथ्या आणि बांगलादेशचा मुशफिकुर रहिम (Mushfiqur Rahim) 11014 धावा करत पाचव्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटच्या वेळी जेव्हा केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झालेला, तेव्हा निकाल काय होता?
मोठी बातमी! अँड्र्यू फ्लिंटॉफच्या कारचा भीषण अपघात! हवाई मार्गाने रुग्णालयात दाखल