Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मर्सिडीजचं जाऊच द्या, पंतकडे एकापेक्षा एक गाड्यांचा ताफा, किमती कोटींच्या घरात; संपत्तीचा आकडा उडवेल झोप

मर्सिडीजचं जाऊच द्या, पंतकडे एकापेक्षा एक गाड्यांचा ताफा, किमती कोटींच्या घरात; संपत्तीचा आकडा उडवेल झोप

December 30, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant-Car-Collection

Photo Courtesy: Instagram/rishabpant


सध्या देशभरात एकाच विषयाची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या अपघाताची. पंत शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) रुडकी येथील त्याच्या घरी जात होता, तेव्हाच दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. यावेळी पंत त्याच्या मर्सिडीज बेंझ या महागड्या गाडीत होता. मात्र, या अपघातानंतर गाडी जळून खाक झाली. या अपघातात पंतचा जीव वाचला, पण तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत सुधारल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पंतकडे ही एकमेव कार नाहीये, तो अनेक महागड्या गाड्यांचा मालक आहे. चला तर रिषभ पंतची लाईफस्टाईल कशी आहे जाणून घेऊयात.

रिषभ पंतचे कार कलेक्शन
द मस्टँग
रिषभ पंतच्या कार कलेक्शनविषयी (Rishabh Pant Car Collection) बोलायचे झाले, तर त्याच्या ताफ्यात ‘द मस्टँग’ या गाडीचाही समावेश आहे. फोर्डच्या या गाडीमध्ये व्ही8 हे इंजिन लागले आहे. हे इंजिन महागड्या आणि लक्झरी कारमध्ये पाहायला मिळते. भारतात मस्टँग गाडीची किंमत 75 लाखांपासून सुरू होते. याव्यतिरिक्त पंतच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ जीएलसीचा समावेश आहे. याच गाडीमध्ये त्याचा अपघात झाला. जर्मन एसयूव्हीमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड 4 सिलेंडर इंजिन आहे, जो 190 हॉर्सपावर आणि 400 एनएम टॉर्क निर्माण करतो. या गाडीची किंमत जवळपास 76 लाखांपासून सुरू होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

रेंज रोव्हर स्पोर्ट्स
रिषभ पंत याच्या गाड्यांच्या ताफ्यात रेंज रोव्हर स्पोर्ट्सचाही समावेश आहे. या गाडीमध्ये 3.0 लीटरचे टर्बोचार्ज्ड व्ही6 इंजिन आहे, जे 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 345 हॉर्स पॉवर निर्माण करते. या गाडीची किंमत जवळपास 1 कोटीपासून सुरू होते. या गाडीत हीटेड सीट्स, फाईन लेदर अपहोल्स्ट्री, 4 झोन क्लायमॅट कंट्रोल आणि सॉफ्ट क्लोज डोअर यांसारख्या सुविधा आहेत.

‘हुंडाई आय20’ होती ड्रीम कार
रिषभ पंतने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, “मला लहानपणापासूनच आय20 गाडी आवडते. मला फक्त एवढेच माहिती होते की, ही माझी आवडती गाडी असेल.” आता त्याने त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात आय20सह इतर अनेक महागड्या गाड्यांचा समावेश केला आहे.

रिषभ पंतचे शिक्षण
रिषभ पंतचा जन्म 4 ऑक्टोबर, 1997 मध्ये रुडकी, उत्तराखंड येथे झाला होता. पंतने अनेक शहरांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याने काही वर्षे डेहराडून येथील इंडियन पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. यानंतर तो कुटुंबासह दिल्लीला शिफ्ट झाला. त्याने दिल्ली विद्यापीठाच्या श्री वेंकटेश्वर महाविद्यालयातून पदवी घेतली. क्रिकेटच्या सरावासोबतच त्याने बी. कॉमचे शिक्षणही घेतले आहे. विशेष म्हणजे, 12 वर्षांच्या वयातच त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने दिल्लीच्या सोनेट क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवले होते.

तब्बल 100 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक
रिषभ पंत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आयपीएलमधून त्याने 74 कोटी रुपये कमावले आहेत. तो आयपीएलमध्ये आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधारही आहे. याव्यतिरिक्त त्याला बीसीसीआयकडून वार्षिक करारांतर्गत पगारही दिला जातो. तो जाहिरातींमधूनही बक्कळ पैसा कमावतो. काही रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 100 कोटींहून अधिक असू शकते. (rishabh pant car collection cricketer has many luxury cars know his property and money)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट ते सेहवाग, ‘हे’ दिग्गज अपघातग्रस्त पंतसाठी चिंतेत; मोदीही म्हणाले, ‘या घटनेने मी…’
माणूस व्हा रे! रिषभच्या अपघातानंतर कार्तिकची लोकांना कळकळीची विनंती; म्हणाला…


Next Post
Hardik-Pandya

'त्याच्यात नेतृत्वाच्या सर्व खुबी', श्रीलंकेचा दिग्गज बनला हार्दिकचा फॅन

ab-de-villiers

आयपीएलमुळे माझे आयुष्य बदलले! एबी डिविलियर्सचे मोठे विधान

Imam-Ul-Haq

पाकिस्तानी खेळाडूचे न शोभणारे कृत्य! आधी सीमारेषेवर आपटली बॅट, नंतर मैदानाबाहेरच्या खुर्चीवरही काढला राग

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143